Type Here to Get Search Results !

खामगांव घाटपुरी छोटी देवी परिसरात अवैध धंदे बंद करण्याची मनसे कडून मागणी*

 * खामगांव घाटपुरी छोटी देवी परिसरात

अवैध धंदे बंद करण्याची मनसे कडून मागणी*



घाटपुरी येथील छोटी देवी

परिसरात अवैध धंदे, दारू,

मटका, जुगार इत्यादी

व्यवसाय सुरू आहेत.

स्थानिक परिसरातील

रहिवासी, शाळकरी मुले

तरुण पिढी व्यसनाधीन होऊन महिला वर्गावर अत्याचार व स्थानिक महिला सकाळ व संध्याकाळ फिरत असताना अरेरावी व छेडखानीच्या घटना समोर आल्या. अवैध व्यवसायामुळे वाहनांची गर्दी होत असल्याने शाळकरी मुलांना व रहिवास्यांना याचा त्रास व सतत हाणामारी, वाद या सर्व बाबी सहन कराव्या लागत आहे. मनसे शहर उपाध्यक्ष


करण दिक्षित यांनी शिवाजीनगर म पोलिस अधिकारी सुरेंद्र अहेरकर यांना निवेदनाद्वारे ७ दिवसात अवैध व धंदे बंद करण्याची मागणी केली हो आहे. अवैध धंदे बंद न झाल्यास स मनसे स्टाईलने आंदोलनात्मक लढा  उभा करण्यात येईल असे मनसे शहर उपाध्यक्ष करण दिक्षित यांनी असे निवेदनात म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments