*शेगांव तालुक्यातील माटरगाव बु येथे एकाचा खुन तर
दोन महीला गंभीर जख्मी*
-शेगाव तालुक्यातील माटरगाव येथे आज पैशाच्या वादातून खुनी थरार झाल्याची घटना समोर आली आहे. चुलत भावाने कुन्हाडीने वार करून भावाची हत्या केली असून दोन महिलांना गंभीर रित्या जखमी केले आहे. जखमी महिलांना उपचारासाठी अकोला हलविण्यात आले आहे.
माटरगाव येथील शत्रुघ्न मिरगे व भास्तन येथील त्यांचा चुलत भाऊ सोपान मिरगे यांच्यामध्ये मागील काही दिवसांपासून पैशाच्या कारणावरून वाद धुमसत होता. दरम्यान शत्रुघ्न मिरगे हे पत्नी व सालीसह आज दुपारी माटरगाव येथील बाजारात गेले होते. यावेळी त्यांचा चुलत भाऊ सोपान मिरगे याने तेथे येऊन त्यांच्याशी पुन्हा त्याच कारणावरून वाद घातला व शत्रुघ्न मिरगे यांच्यावर कुन्हाडीचे सपासप वार केले. यावेळी भांडण आवरण्यासाठी गेलेल्या शत्रुघ्न मिरगे यांच्या पत्नी राणी मिगे वसाळी मोनाली भागवत चैडाळणे यांनाही सोपान मिरगे याने कुल्हाड़ी ने मारहाण केली. भर दुपारी गर्दीच्या बाजारात घडलेल्या या प्रकाराने एकच खळबळ उडाली. यावेळी नागरिकांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शत्रुघ्न मिरगे व इतर दोन महिलांना खामगाव येथील सामान्य ग्णालयात आणण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी तपासणी करून शत्रुघ्न मिरगे यांना मृत घोषित केले तर या हल्ल्यामध्ये गंभीरित्या जखमी झालेल्या राणी मिरगे व मोनाली चंडाळणे यांना उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या घटनेने माहीती मिळतात जलमरुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून वृत्त लिहेपर्यंत पुढील पोलीस कारवाई सुरू होती.

Post a Comment
0 Comments