Type Here to Get Search Results !

हिंदुसेवक ॲड. अमोल अशोकराव अंधारे यांचा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेना मुख्यनेते एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या हस्ते शिवसेनेत जाहीर प्रवेश*

 *हिंदुसेवक ॲड. अमोल अशोकराव अंधारे यांचा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेना मुख्यनेते एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या हस्ते  शिवसेनेत जाहीर प्रवेश*


*खामगाव परिसरातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण*


खामगाव | प्रतिनिधी

आज अकोला येथे आयोजित भव्य जाहीर सभेत शिवसेना मुख्यनेते,

महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री  *मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब* यांच्या हस्ते, केंद्रीय मंत्री मा.ना.श्री. प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनात व प्रमुख उपस्थितीत, आमदार संजू भाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वात हिंदुत्ववादी विचारांचे प्रभावी नेतृत्व ॲड. अमोल अशोकराव अंधारे यांनी हजारो शिवसैनिकांचा साक्षीने शिवसेनेत अधिकृत जाहीर प्रवेश केला.

या ऐतिहासिक पक्षप्रवेश सोहळ्यास खामगाव विधानसभा मतदारसंघाचे पक्ष निरीक्षक मा. आमदार श्री. संजयजी रायमुलकर,  श्री. शशिकांतजी खेडेकर तालुका प्रमुख राजू बघे यांच्यासह तालुक्यातील शेकडो समर्थक तसेच असंख्य पदाधिकारी, शिवसैनिक व हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजराजेश्वर नगरीत झालेल्या या जाहीर प्रवेशामुळे संपूर्ण खामगाव परिसरातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे

ॲड. अमोल अशोकराव अंधारे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बालपणापासूनचे स्वयंसेवक असून, गेल्या तीन दशकांहून अधिक काळ त्यांनी संघ परिवारातील विविध संघटनांमध्ये निष्ठेने कार्य केले आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, बजरंग दल व विश्व हिंदू परिषद या संघटनांमध्ये त्यांनी शाखा संयोजक ते प्रांत सहमंत्री (विदर्भ) अशा विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या आहेत तसेच खामगाव नगरीचे गौरव पुरस्कार प्राप्त हनुमान व्यायाम मंडळ सचिव पदी सुद्धा कार्य करत आहे नुकताच त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील प्रेस क्लब खामगाव कडून "जिल्हा गौरव" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे . हिंदुत्व, राष्ट्रभक्ती व सामान्य कार्यकर्त्यांच्या न्यायासाठी सातत्याने संघर्ष करणारे नेतृत्व म्हणून त्यांची संपूर्ण विदर्भात ओळख आहे.

या जाहीर सभेदरम्यान प्रवेशवेळी ॲड. अमोलभाऊ अंधारे यांनी शिवसेना मुख्यनेते मा. एकनाथजी शिंदे साहेब व केंद्रीय मंत्री मा. प्रतापरावजी जाधव साहेब यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. तसेच खामगाव तालुक्यातील व घाटाखालील संपूर्ण परिसरात हिंदुत्ववादी ५१०० कार्यकर्त्यांच्या शिवसेना प्रवेशाकरिता खामगाव येथे भव्य जाहीर सभा देण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली.

यावेळी मा. एकनाथजी शिंदे साहेबांनी ॲड. अमोलभाऊंच्या पाठीवर आशिर्वादरूपी हात ठेवत *“नक्की लवकरच येतो कामाला लागा”* असे आश्वास्थ केले. या आश्वासनामुळे खामगाव परिसरातील शिवसैनिक, हिंदुत्ववादी कार्यकर्ते व अमोलभाऊ समर्थकांमध्ये प्रचंड उत्साह संचारला असून, हिंदुत्वाची नवी लाट निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

ॲड. अमोल अशोकराव अंधारे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या संघटनात्मक बळात मोठी वाढ होणार असल्याचे राजकीय जाणकारांकडून बोलले जात आहे.

Post a Comment

0 Comments