(राजु पाटील घाटे मलकापुर बुलढाणा)
*पत्रकार हा वास्तववादी चेहरा दाखवणारा खरा आरसा - ठाणेदार संदीप काळे*
*दयाभाई खराटे स्मृतिदिनी पत्रकारांचा सन्मान*
पत्रकार हा समाजाभिमुख असून असंख्य जबाबदारीचे ओझे खांद्यावर घेऊन पत्रकारिता करीत असताना सामाजिक वेदनेचे भान ठेवून समाजातील अन्याय अत्याचार, दुःख आपल्या लेखणीच्या माध्यमातून दूर व्हावे यासाठी कटीबद्ध राहणारा पत्रकार हा समाजाचा वास्तववादी चेहरा दाखवणारा खरा आरसा आहे असे प्रतिपादन मलकापूर ग्रा.पो.स्टे. ठाणेदार संदीप काळे यांनी केले
जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यातील सक्रिय योद्धे व बाबासाहेबांची चळवळ संपूर्ण जिल्ह्यात पोहोचवणारे समाजरत्न दयाभाई खराटे यांच्या १६ वया स्मृतिदिनानिमित्त जनता महाविद्यालय मलकापूर येथे अभिवादन सभेचे व पत्रकारांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते
पत्रकार बाधवांचा समाजरत्न दयाभाई खराटे फाउंडेशन यांच्या वतीने मागील १० वर्षापासून अतिश खराटे यांच्या स्तुत्य उपक्रमाद्वारे "पत्रकारिता गौरव पुरस्कार" देऊन सन्मान करण्यात येत असतो, या वर्षी सुद्धा पत्रकार बांधवांचा भेटवस्तू देवून सन्मान करण्यात आला तथा यावर्षीचा "राज्यस्तरीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता पुरस्कार" ज्येष्ठ पत्रकार उत्तमराव वानखेडे यांना प्रदान करण्यात आला
या सभेला प्रमुख वक्ते म्हणून दादाभाऊ अभंग अध्यक्ष भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समिती होते, अध्यक्षस्थानी भा.बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष एस. एस.वले सर होते तर प्रमुख अतिथी म्हणून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा नेते प्रशांतभाऊ वाघोदे, मलकापूर ग्रा.पो.स्टे.ठाणेदार संदीप काळे, एमआयडीसी पो.स्टे.ठाणेदार हेमराज कोळी ,शाहीर डी.आर.इंगळे, अजय सावळे, सुशील मोरे, डॉ.आर.डी.इंगोले सर, उत्तमराव वानखेडे, वंचितचे युवा जिल्हाध्यक्ष अनिल वाकोडे, खामगाव कृ ऊ.बा.स.उपसभापती संघपाल जाधव, री.सा.सं अध्यक्ष प्रकाश दांडगे उपस्थित होते
याप्रसंगी पत्रकार अजय टप, नथूजी हिवराळे, धनश्री काटीकर, श्रीकृष्ण तायडे, अशोक रवणकार, अबू बागवान, शेख जमील, श्रीकृष्ण भगत, करण शिरसवाल, शेख निसार, कैलास काळे, भागवत दाभाडे, विनायक तळेकर, निलेश चोपडे, पंकज मोरे, सय्यद ताहेर, प्रकाश थाटे, सागरकुमार झणके, ॲड.मनोज बागडे, करण झणके, मो. सरवर, प्रदीप इंगळे आदी पत्रकार बांधव उपस्थित होते
सभेचे प्रास्ताविक अतिशभाई खराटे यांनी तर सूत्रसंचालन भाऊराव उमाळे यांनी केले



Post a Comment
0 Comments