*घाटपुरी येथील जिल्हा परिषद शाळेची ३० वर्षांनंतर प्रथमच शैक्षणिक सहल, विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर शिक्षक आणि शिक्षिका मुळे फुलले हास्य.*
*खामगाव :-* घाटपुरी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतर्फे ३० वर्षांनंतर प्रथमच शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले. यामुळे सहलीचा आनंद लुटण्यासोबच विद्याथ्यांच्या ज्ञानात भर पडली. जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा घाटपुरी येथील शैक्षणिक सहल दिनांक ३ जानेवारी रोजी संपन्न झाली. या सहलीमध्ये इयत्ता ४ ते ८ वीतील विद्यार्थी सहभागी झाले. जागतिक वारसा असलेले
ऐतिहासिक स्थळ पाहणे व त्यातून आपले पूर्वज कसे होते त्यांनी या भव्य वास्तू, किल्ले, मंदिर कसे बांधले असतील याचे कुतूहल मुलांना नेहमीच असते. त्या भव्य वास्तू प्रत्यक्षात पाहण्याचा योग जिल्हा परिषद शाळा घाटपुरी येथील मुलांना आला. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती पाखरे मँडम व शाळेतील शिक्षक राजेंद्र सुरवाडे सर व सर्व शिक्षिका यांच्या पुढाकाराने नियोजन करून प्रथम
विमानतळ, सिद्धार्थ गार्डन, बीबी का मकबरा, देवगिरी किल्ला, वेरूळ लेगी, घुसणेश्वर मंदिर व भद्रा मारुती आदी सर्व ठिकाणे पाहून विद्यार्थी व विद्यार्थीनी आनंदित झाले. ऐतिहासिक वास्तुबावत मुलांना शिक्षकांनी सविस्तर माहिती दिली. घाटपुरी शाळेतील एकूण ५२ मुले मुली सहलीत सहभागी झाले होते. एस टी महामंडळाच्या लालपरीतून विद्यार्थ्यांनी ही सहल अनुभवली.

Post a Comment
0 Comments