Type Here to Get Search Results !

आमसरी फाट्याजवळ भीषण अपघातात नांदुरा तालुक्यातील बोंबटकर परिवारातील मायलेकींचा दुर्दैवी मृत्यू; वडील गंभीर जखमी

 खामगांव नांदुरा रोडवर आमसरी फा


आमसरी फाट्याजवळ भीषण अपघात
 नांदुरा तालुक्यातील  बोबटकर परिवारातील मायलेकींचा दुर्दैवी मृत्यू; वडील गंभीर जखमी

आमसरी फाटा (ता. खामगाव_) : आमसरी फाट्याजवळ आज झालेल्या भीषण अपघातात नांदुरा तालुक्यातील  बोबटकर परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. मोटारसायकलला भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने माय–लेकीचा जागीच मृत्यू झाला, तर मोटारसायकल चालक असलेले बाप गंभीर जखमी झाले आहेत.
घटनेतील मृतांमध्ये बोबटकर यांच्या घरातील  महिलेचा आणि तिच्या मुलीचा समावेश आहे. तर गंभीर जखमी झालेल्या  बोबटकर यांच्यावर तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार ट्रकचा वेग अत्यंत जास्त होता. धडक इतकी जोरदार होती की मोटारसायकल काही मीटरवर फेकली गेली. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलिस व रुग्णवाहिकेला माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. बोबटकर परिवारातील दोन जीव गमावल्याने गाव शोकाकुल झाले आहे.

Post a Comment

0 Comments