माटरगाव बु येथे दिनांक 10/01/2025 शनिवार रोजी सावित्री जिजाऊ दशरात्र उत्सव भरारी महिला ग्राम संघाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून ग्राम संघाचे अध्यक्ष उर्मिलाताई रोठे तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच सौ शुद्धमाती ताई निखाडे ग्रा पं सदस्य सौ राधिकाताई टिकार , सौ उज्वलाताई मिरगे हे लाभले होते मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व मासाहेब जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले जिजाऊ वंदना घेऊन कार्यक्रमाला सुरुवात केली . निखाडे ताई यांनी सावित्रीबाई फुले फातिमा शेख व जिजामाता या तीनही स्त्रियांचा जीवन प्रवास आपल्याला संघर्षातून यश मिळवण्याची प्रेरणा देतो असे आपले मार्गदर्शनातून सांगितले . राधिकाताई टिकार यांनी धैर्य शिस्त स्वाभिमान स्त्री सन्मान अन्याय विरुद्ध उभे राहण्याची ताकद हे गुण प्रत्येक स्त्रीनेआपल्या अंगी करावे असे विचार मांडले यावेळी ग्राम संघातील सदस्य युगंधरा देशमुख, दिपाली मिरगे, कल्पना बोराखडे यांनी सावित्रीबाई जिजामाता यांचे गीत सादर केले. या दशरथोत्सवानिमित्त ग्राम संघाने ग्राम स्वच्छता अभियान स्त्री साक्षरता अभियान , बालिका दिन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत ग्रामपंचायत व भरारी ग्राम संघ माटरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कापडी बॅगचे पाच दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन सुद्धा करण्यात आले प्रशिक्षिका सौ मंगलाताई सपकाळ साधनाताई देशमुख यांनी महिलांना उत्कृष्ट पद्धतीने प्रशिक्षण दिले अध्यक्षीय भाषणामधून फक्त जिजाऊ सावित्री व फातिमा शेख यांचे नाव घेऊन थांबू नका तर त्यांच्या मातृत्वातून संघर्षातून प्रेरणा घ्या त्यांच्या गुणांना आचरणात आणा असे प्रतिपादन उर्मिला ताई रोठे यांनी केले आपापल्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला . कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन ग्राम सखी ज्योतीताई जगताप यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्राम सखी सुनीताताई नागपुरे रुक्मिणीताई नागपुरे अनिताताई शिंगण लता ताई गावंडे ,प्रीती ताई गुळबेले यांचे सहकार्य लाभले कार्यक्रमास प्रशिक्षणार्थी व ग्राम संघातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या

Post a Comment
0 Comments