*डॉ निवृत्ती भाऊ विठ्ठलराव राजे जाधव यांना राष्ट्रसंत गाडगेबाबा समाज रत्न पुरस्कार जाहीर.*
मौजे चिखली आयोजित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त व काल कथित मधुकरराव खंडारे यांच्या स्मृती प्रित्यर्थ व समाज भूषण अर्जुनराव गवळी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन करण्यात आलेल्या राज्यस्तरीय पुरस्कार 2025 सोहळ्यामध्ये *संजिवनी बहु शिक्षण प्रसारक संस्था केळवद ता चिखली जि बुलढाणा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष* *मा. निवृत्ती भाऊ राजे जाधव सर्जनशील व्यक्तिमत्त्व यांना संत गाडगेबाबा समाज रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले*. संत गाडगेबाबांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाजसेवेचे व्रत स्वीकारले इतरांना जागृत केले. गोपाला गोपाला पुकारले आज ही गजर निवांत आहे मानवता हीच जगी श्रेष्ठ असते साऱ्या जगाला सांगतो आहे. उत्सव यशाचा सन्मान कर्तुत्वाचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा 2025 साखरखेर्डा ता सिंदखेडराजा जि बुलढाणा यांच्या वतीने मुख्य आयोजक सचिन खंडारे पत्रकार व कैलास भाई सुखदाने , भाई वानखेडे, उपजिल्हाधिकारी मा प्राध्यापक श्री संजय जी खडसे साहेब , सचिन अंबादास काटे, कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा अध्यक्ष अस्तित्व फाउंडेशन व सरपंच साखरखेर्डा दाऊद सेट कुरेशी , मित्रवर्य प्रवीण गीते, पत्रकार प्रताप दादा मोरे जिल्हाध्यक्ष अभा पत्रकार संघ बुलढाणा, माजी केंद्रप्रमुख दिलीपराव खंडारे,अनिल तुपकर सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती , अर्जुनराव गवळी समाजभूषण तथा अनिकेत सैनिकी स्कूल ,कवी रामदास कोरडे, साखरखेर्डा येथील ठाणेदार साहेब, इत्यादी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले . ते 5 मे रोजी गेल्या 18 वर्षापासून सामूहिक विवाह सोहळा सातत्याने घेतात व वृक्षारोपण कार्यक्रम, झाडे लावा झाडे जगवा, कामगारांना पेटी वाटप, कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती देणे ,कामगारांसाठी काम करणे व महिलांसाठी शिवणकला प्रशिक्षण, ब्युटी पार्लर ,कम्प्युटर ट्रेनिंग सेंटर संस्थेकडून सुरू आहे गाव तेथे शेतकरी मंडळ नाबार्डच्या वतीने शेतकऱ्यांना प्रशिक्षण, मधमाशी प्रशिक्षण, शेळी पालन ,प्रशिक्षण मत्स्यपालन प्रशिक्षण व इत्यादी प्रकारचे प्रशिक्षण संस्थेमार्फत दिल्या जातात , विधवा महिलांसाठी बाल संगोपन योजना.असंघटित कामगारांसाठी जनश्री योजना इत्यादी प्रकारचे समाज उपयोगी कार्यक्रम राबवीत आहे त्या कार्याचे दखल घेऊन .महाराष्ट्र शासनाचा मुख्यमंत्रीच्या हस्ते शाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार मिळालेला आहे व 1 मे 2025 रोजी जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्या हस्ते व पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांच्या हस्ते जिल्हा युवा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. मलकापूर येथील डिजिटल प्रेस क्लब ऑफ इंडिया च्या वतीने राष्ट्र गौरव पुरस्कार 2025 सुद्धा मिळालेला आहे.
संत गाडगेबाबांनी स्वतःसाठी काही न करता इतरांसाठी मोठे काम केले आहे. डॉ निवृत्ती विठ्ठलराव राजे जाधव गेल्या अनेक वर्षांपासून शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवराय यांचा वैचारिक वारसा पुढे नेण्याचे कार्य करीत आहेत भारतीय संविधानिक विचार मूल्य जर्मन सात रुचवण्याचे काम करीत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असतो परंतु सामाजिक उपेक्षित घटकांना काहीतरी देणे आहे म्हणून यांनी सामाजिक कार्यातून लोकांना मदत, जनजागृती करिता कार्य, आणि याच कार्याची दाखल म्हणून डॉक्टर निवृत्ती भाऊ जाधव यांना सामाजिक कार्यातील भरीव योगदान बदल संत गाडगेबाबा समाजातनं पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.

Post a Comment
0 Comments