*अट्रासिटी प्रकरणातील आरोपींवर कारवाईसाठी उपविभागीय महसूल कार्यालय खामगाव येथे एस.सी.व एसटी जातीच्या नागरिकांचे बेमुदत धरणेआंदोलन आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस.*
खामगाव:-खामगाव ग्रामिण
पोस्टेमध्ये अप.क्र. ४७७/ २०२५ मधील आरोपींना
तात्काळ अटक करण्यात यावी. तसेच अप.क्र. १/ २०२६ चा
गुन्हा रद्द करण्यात यावा अन्यथा
११ जानेवारी २६ रोजी उपविभागीय अधिकारी (महसुल) यांच्या कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करण्यात येईल, असे निवेदन अप्पर जिल्हा पोलिस अधिक्षक यांना अॅड. अनिल प्रकाश इखारे व एससी, एसटी जातीच्या नागरिकांनी ९ जानेवारी २६ रोजी दिले होते. निवेदनाची दखल घेण्यात आली नसल्याने काल ११ जानेवारी २६ पासून उपविभागीय अधिकारी (महसुल) कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यातआले असुन यामध्ये अँड.अनिल इखारे, गौतम विष्णु नाईक, भारत भगवान अंभोरे,अनिल वसंता इंगळे, अँड.ए.एस.भोजने आदिंचा समावेश आहे.

Post a Comment
0 Comments