Type Here to Get Search Results !

खामगाव सा बा विभाग, जि. बुलढाणा यांना राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने देन्यात आले निवेदन माटरगाव ते खामगाव ते माटरगाव रोडवर स्पीड ब्रेकर (गतिरोधक) बसविण्याबाबत न

 मा. कार्यकारी अभियंता

सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD)

खामगाव सा बा विभाग, जि. बुलढाणा यांना राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने देन्यात आले निवेदन 

 माटरगाव ते खामगाव ते माटरगाव रोडवर स्पीड ब्रेकर (गतिरोधक) बसविण्याबाबत न


सविनय निवेदन असे की, माटरगाव (खामगाव) ते माटरगाव हा सार्वजनिक रस्ता असून या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात दुचाकी, चारचाकी व अवजड वाहनांची वाहतूक होत आहे. सदर रस्त्यावर वस्तीचा परिसर / शाळा / एसटी बस थांबा असल्यामुळे नागरिक, विद्यार्थी व प्रवाशांची सतत वर्दळ असते.

वाहने भरधाव वेगाने चालत असल्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून यापूर्वीही किरकोळ अपघात झालेले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व अपघात टाळण्यासाठी योग्य ठिकाणी स्पीड ब्रेकर (गतिरोधक) तसेच आवश्यक सूचना फलक तात्काळ बसविण्यात यावेत, ही नम्र विनंती.

आपण सदर विषयाची गांभीर्याने दखल घेऊन त्वरित कार्यवाही करावी, ही अपेक्षा.

धन्यवाद.

आपला नम्र,

नाव : शेख अयाज शेख अमीर 

(राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अ.प)

पत्ता : माटरगाव, ता. शेगाव, जि. बुलढाणा

मोबाईल नं. : 9730577242

दिनांक : 

प्रतिलिपीत,

मा.मा.आमदार राणा दिलीपकुमारजी सानंदा

(खामगाव विधानसभा)दिनकर भारंबे नारायण फंडात इमदाद खान सदानंद इंगळे किशोर मुडे अविनाश गावंडे

Post a Comment

0 Comments