*विहिरीत पडलेल्या दोन नंदीला बाहेर काढण्यात गौ सेवकांना यश*
*दिनांक 13/01/2026*
खामगांव :- सिव्हील लाईन सप्तश्रुंगी माता मंदिर जवळच्या विहीरीत दोन नंदी पडलेले होते घटनेची माहिती नगर परिषद कडून दिनांक 11 2016 रोजी सायंकाळी 7:30 वाजता मिळताच अवघ्या पाच मिनिटात मिळताच एकनिष्ठा गौ सेवा रक्तसेवा फाउंडेशनचे सुरजभैय्या यादव यांनी आपले सहकारी अभिषेक देशमुख यांना कॉल करून बोलवून घेतले. अभिषेक देशमुख यांनी आपल्या जिवाची परवा न करता लगेच त्यांच्या कंबरेला दोरी बांधून त्यांना दोरीच्या सहाय्याने विहीरीत उतरवण्यात आले. घटनास्थळी शेकडो नागरिक उपस्थित असतांना कोणाचीही हिम्मत विहिरीमध्ये जाण्याची होत नव्हती गौ सेवक सुरजभैय्या यादव, सौरभ पाटील यांच्या विश्वासावर अभिषेक देशमुख यांनी आपला जीव धोक्यात टाकून विहीरीत पडलेल्या दोन नंदीला आपल्या जिवाची परवा न करता एकाला जिवंत तर दुसऱ्या नंदीला मृत क्रेनच्या पट्ट्यात बांधून बाहेर काढले या गौ सेवेत गोपाल सकळकळे, शिव शर्मा, आशिष जांभे, विशाल पवार, सुनिल गुळवे, महेश देशमुख, संजय शर्मा, अनंता शहाणे, नगर परिषदेचे अनंत निळे क्रेन प्रसाद डोरले यांच्या कडून बोलविण्यात आली होती. व तसेच मृत पडलेल्या नंदीचे अंतिमसंस्कार नगर परिषद कडून डम्पिंग ग्राऊंड वर नेऊन करण्यात आले अशी माहिती सौरभ पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

Post a Comment
0 Comments