Type Here to Get Search Results !

मुक्ताईनगर तालुक्यातील भोटा येथे राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्यी जयंती साजरी करण्यात आली

 मुक्ताईनगर तालुक्यातील भोटा येथे राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्यी जयंती साजरी करण्यात आली                              (सुनिल जगताप मुक्ताईनगर)




                                                                     संघर्ष, त्याग, धैर्याचे कीर्तिवंत उदाहरण म्हणजे स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब*! स्त्रीशक्ती आणि नेतृत्वाच्या प्रतीक असणाऱ्या प्रजाहितदक्ष *राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांना* तसेच  *युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद*, एक महान *भारतीय तत्त्वज्ञ, समाजसुधारक* ज्यांनी वेदांत आणि योगाचे ज्ञान पाश्चात्त्य जगाला दिले, *रामकृष्ण मिशनची स्थापना केली आणि 'उठा, जागे व्हा आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका*' यांसारख्या विचारांनी ज्यांनी तरुणांना प्रेरणा व ऊर्जा दिली यांच्या *जयंतीनिमित्त आज त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून* त्यांना अभिवादन करण्यात आले त्यांनी केलेल्या *महान कार्याचे स्मरण* व त्यांच्या आठवणींना या वेळी उजाळा देण्यात आला *या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवस्मारक समिती अध्यक्ष श्री शैलेश पाटील* यांनी केले

 *याप्रसंगी कु. गायत्री सरोदे* या तरुणीने *राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद, शिव छत्रपती शिवाजी महाराज* यांच्या विषयी आपलं मनोगत व्यक्त केले

*याप्रसंगी सर्व भोटा ग्रामस्थ संस्थेतील पदाधिकारी सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, तरुण मिञ मंडळी यावेळी उपस्थित होते*.!

Post a Comment

0 Comments