आश्रम शाळा किन्ही नाईक येथे राजमाता जिजाऊंची 428 वि जयंती मोठ्या उत्साहात साजरी*
चिखली - उदयनगर, येथून जवळच असलेली प्राथ, माध्य व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रम शाळा, किन्ही नाईक, ता- चिखली जि- बुलढाणा येथे राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेबांची 428 वी जयंती व युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांची 163 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य श्री दांदडे सर होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मंचावर पाटील मॅडम, कऱ्हाळे सर, सुसर सर, प्रा.धोंडगे सर व पालक म्हणून गावातील आदरणीय व्यक्तिमत्व विनोद कोकाटे उपस्थित होते. शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी भाषणामध्ये सहभाग घेतला. अनेक मुलींनी राजमाता जिजाऊ मासाहेबांची वेशभूषा साकारली होती. विशेषतः वर्ग अकरावी (कला) ची विद्यार्थिनी कु योगिता शिंदे हिने राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांची वेशभूषा साकारून 'मी जिजाऊ बोलते..' या विषयावर एकांकिका सादर करून अत्यंत सुंदर पद्धतीने आपले विचार मांडले. ऋतिका कोकाटे या विद्यार्थिनीने लयबद्ध व ओघवत्या भाषणातून प्रेक्षकांची मने जिंकली, लक्ष्मी अंभोरे, रुक्मिणी वाघमारे, वैष्णवी शिंदे, अस्मिता, दुर्गेश्वरी धोत्रे रुक्मिना गाढवे इत्यादी विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊंच्या जीवनावर अत्यंत सुंदर पद्धतीने आपले मौलिक विचार मांडले. सुसर सर, कऱ्हाळे सर,पाटील मॅडम, प्रा. धोंडगे सर यांनी राजमाता जिजाऊंच्या जीवनाविषयी व एकूणच मराठ्यांच्या तत्कालीन शौर्य व पराक्रमाविषयी महत्त्वाची माहिती सांगितली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले प्राचार्य श्री दांदडे सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना अत्यंत सोप्या पद्धतीने तत्कालीन इतिहास समजावून सांगितला. कार्यक्रमाचे यशस्वी संचलन श्री बोरसे सर यांनी केले व मान्यवरांचे आभार प्रा. टाले सर यांनी मानले. अतिशय सुंदर पद्धतीने कार्यक्रम पार पडला असून कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली. *बातम्या आणी जाहीराती साठी संपर्क विनोद कोकाटे चिखली

Post a Comment
0 Comments