*राजामाता जिजाऊ जन्मोत्सव मोठया उत्सहात साजरा*
खामगाव -स्वराज्य जननी, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय मराठा महासंघ, मराठा समाज सेवा मंडळ अखिल भारतीय म
राठा महासंघ युवक मंडळ तसेच मा. भारती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने जिजाऊ जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
हा कार्यक्रम छत्रपती शिवाजीनगर, खामगाव येथे पार पडला. यावेळी समाजातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवर व कार्यकर्त्यांनी राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जिजाऊ वंदना व अभिवादन केले.
कार्यक्रमाच्या विशेष आकर्षण म्हणून लाठीकाठीद्वारे मानवंदना देण्यात आली. राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या त्याग, संस्कार व राष्ट्रभक्तीचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी उपस्थित सर्वांनी राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या विचारांवर चालण्याचा निर्धार केला. यावेळी शेकडो शिव भक्ताची व भगिनीची कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अखिल भारतीय मराठा युवक महासंघ व माँ भारती प्रतिष्ठान चे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी परिश्रम घेतले.

Post a Comment
0 Comments