Type Here to Get Search Results !

गौ सेवक सुरजभैय्या यादव यांना स्वामी विवेकानंद राष्ट्रीय गौरव-सेवा पुरस्कार जाहीर*

 


*गौ सेवक सुरजभैय्या यादव यांना स्वामी विवेकानंद राष्ट्रीय गौरव-सेवा पुरस्कार जाहीर*



*दिनांक 12/01/2026*

खामगांव :-  सामाजिक कार्यकर्ते गौ सेवक सुरजभैय्या यादव यांना स्वामी विवेकानंद राष्ट्रीय गौरव-सेवा पुरस्कार जाहीर आज दिनांक 12 जानेवारी रोजी रिसरा जिल्हा हुगली पश्चिम बंगाल मध्ये होणार गौरव सोहळा सामाजिक क्षेत्रात व तसेच गौ सेवेत सदैव अग्रेसर राहणारे एकनिष्ठा गौ सेवा रक्तसेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुरजभैय्या यादव यांनी आता पर्यंत केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांची स्वामी विवेकानंद गौरव-सेवा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. हा प्रतिष्ठेचा पुरस्कार सेवा जीव कल्याण ट्रस्ट 22/11, पी. टी.लहा स्ट्रीट रिसरा जिल्हा हुगली पश्चिम बंगाल यांच्या वतीने प्रदान करण्यात येणार आहे. हा सन्मान सोहळा आज दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आला असून, या सोहळ्यात सुरजभैय्या यादव यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला जाणार आहे सामाजिक कार्यकर्ते सुरजभैय्या यादव यांनी नेहमी गरजू गरीब दिव्यांग लोकांसाठी निःस्वार्थ पणे कार्य सुरु ठेवुन त्यांच्या अडचणी दूर करून त्यांना न्याय मिळवून दिलेला आहे सामाजिक प्रश्न जनतेच्या अडचणी व तसेच गौ सेवेच्या माध्यमातून त्यांनी निर्भीडपणे समस्या सोडविलेल्या आहे त्यांच्या समाजोपयोगी व मूल्याधिष्ठीत कार्याची दखल घेत सेवा जीव कल्याण ट्रस्ट कडून हा राष्ट्रीय पातळीवरील गौरव -सेवा पुरस्कार जाहीर करण्यात आला या सन्मानाच्या घोषनेमुळे सामाजिक, क्षेत्रासह गौ सेवा वर्तुळातून त्यांचे अभिनंदन होत असून, विविध स्तरावरून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे अशी माहिती विनोद घोराळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

Post a Comment

0 Comments