*नागपूर सेवाभावी संत गजानन बहुउद्देशीय संस्थेला 'नॅशनल सोशल अँड एज्युकेशन परिषद २०२६ ' मध्ये विशेष सन्मान, संस्थेच्या संस्थाअध्यक्षा सौ. चंदाताई ददगाळ यांनी स्वीकारला विशेष पुरस्कार.*
नागपूर:- विसावा सोशल फाउंडेशन, नागपूर इंटरनॅशनल रिसर्च
आणि
पब्लिकेशन अँड बिझनेस मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नॅशनल सोशल अँड एज्युकेशन परिषद10जानेवारी 2026 मध्ये सेवाभावी संत गजानन बहुउद्देशीय संस्था, पारस अकोला यांना फिल्म सिटी टीव्ही डायरेक्टर कलाकार सुनीलजी गोडबोले यांच्या हातून विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. संस्थेच्या वतीने संस्थाध्यक्ष्या चंदा सुरेश ददगाळ यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या संस्थेला हा सन्मान त्यांच्या सामाजिक कार्यासाठी प्रदान करण्यात आला असून, त्यामध्ये गरजू लोकांना आधार देणे, अनाथ मुलांना आश्रय उपलब्ध
करणे, बेघर लोकांसाठी निवारा उपलब्ध करणे तसेच विधवांचा सन्मान करणे यांचा समावेश आहे. पुरस्कार सोहळा विदर्भ हिंदी साहित्य मधुरम सभागृह, श्री फतेचंद मोर हिंदी भवन, राणी झाशी चौक, वर्धा रोड, नागपूर येथे पार पडला. सुप्रसिद्ध अभिनेता व टीव्ही कलाकार सुनील गोडबोले, नागपूर येथील समाजसेवक डॉ. रवींद्र दिघोरे, प्रसिद्ध उद्योजक
"
रामरतनजी हाडगे अभिनेत्री उज्वला रोडगे, साहित्यिक मनीषा कांबळे, प्राध्यापक डॉ. संजय हर्षे, समाजसेवक ब्रह्मपुरी हे मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते . कार्यक्रमात सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील योगदान सन्मानित करण्यावर भर दिला गेला. उपस्थितांनी संस्थेच्या कार्याची प्रशंसा करत, या सन्मानाचा गौरव अनुभवला.असी माहिती सेवा भावी संत गजानन बहुउद्देशीय संस्थाच्या अध्यक्षा सौ.चंदाताई सुरेश ददगाळ यांनी दिली.

Post a Comment
0 Comments