Type Here to Get Search Results !

ऑनलाइन सेवा जिथे आहे तिथेच ठेवा नाही तर 26 जानेवारीला आंदोलन*

 *ऑनलाइन सेवा जिथे आहे तिथेच ठेवा नाही तर 26 जानेवारीला आंदोलन*




खामगाव

 शासनाच्या ऑनलाइन सेवा सुविधा मधील शर्ती अटीचे भंग करीत असलेल्या वर कार्यवाही करा

 ऑनलाइन सेवा जिथे आहे तिथेच ठेवा नाही तर 26 जानेवारीला आंदोलन

 करणाऱ्याबाबत आज निवेदन सादर केले 

 पियुष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन  जिल्हाधिकारी बुलढाणा व तहसीलदार खामगाव यांना 

देण्यात आले 

तर हे निवेदन खामगाव तहसील येथील नायब तहसीलदार  श्री शिरीष वसावे यांच्याकडे देण्यात आले 

 जिल्ह्यातील विशेषता खामगाव तालुक्यातील ऑनलाईन सेवा केंद्र सरकारने शहरी भागासाठी जीपीएस चे निकष लावत ऑनलाईन सेंटर उपलब्ध करून दिली आहे

याच माध्यमातून ग्रामीण भागामध्ये सुद्धा असेच निकष लावण्यात येऊन ऑनलाइन केंद्र देण्यात आले आहे

यामध्ये शहरी भागासह ग्रामीण भागाकरिता जनतेच्या सुविधे करिता उपलब्ध करून दिले आहे परंतु यामध्ये ग्रामीण भागात या सेवेच्या सुविधा शालेय विद्यार्थी महाविद्यालयीन विद्यार्थी शेतकरी यासह जनतेला सुविधा उपलब्ध होत नसल्याने त्यांना खामगाव शहरांमध्ये येऊन काम करून घ्यावे लागत आहे यातून त्यांना आर्थिक सह मानसिक शारीरिक त्रास होत आहे

ग्रामीण भागात दिलेली ही सेवा केंद्र अवैधरित्या आपल्या कार्यालयाच्या आशीर्वादाने की संमतीने खामगाव शहरामध्ये कार्यान्वित आहेत

या सेवा सुविधा ग्रामीण भागातील जनते करिता उपलब्ध होत नसल्याने या ऑनलाईन सेवा देणाऱ्या अशा सेवा केंद्रावर तत्काळ कार्यवाही करीत त्यांना दिलेले आयडी रद्द करीत इतर बेरोजगारांना देण्यात यावी.

खामगाव येथे अवैद्य रित्या चालू असलेल्या ऑनलाइन सेवा केंद्रावर तत्काळ कार्यवाही करावी करिता ही तक्रार अर्ज उचित कार्यवाही साठी  सादर करण्याचे नमुद केले आहे 

या अत्यंत महत्त्वाचा तक्रारीवर योग्य ती कारवाई न झाल्यास येत्या भारतीय गणतंत्र दिन 26 जानेवारी रोजी आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करावे लागेल याची जबाबदारी सुद्धा आपल्या कार्यालयाचीच राहील. असे निवेदन मध्ये म्हटले आहे यावेळी पियुष चव्हाण यांच्या सह जगमित सिंग सिद्धू स्वप्नील धात्रक शुभम माळवंदे महेश गिरी आदर्श सावदेकर आदी यावेळी उपस्थित होते



Post a Comment

0 Comments