*खामगाव आगारप्रमुख यांना माटरगाव बु.बस सुरु करा यासाठी राष्ट्रवादी (अ.प)कार्यकर्ते शेख अयाज यांनी दिले निवेदन.पर्यायी मार्गाने खामगाव माटरगाव बस वेळेवर चालु न झाल्यास लोकशाही मार्गाने करणार उपोषण असा देण्यात आला इशारा.*
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एस.टी.),
आगार खामगाव.
तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा आमच्या माटरगाव बु। गावासाठी व लाजुड मार्गे खोलखेडं एसटी बस सेवा चालू करण्यात यावी असे की, आमचे माटरगाव बु। (ता. शेगाव, जि. बुलढाणा_) येथे सध्या नियमित एसटी बस सेवा उपलब्ध नाही / पूर्वीची बस सेवा बंद आहे. त्यामुळे गावातील विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार, व्यापारी तसेच आजारी रुग्णांना दवाखाना, शाळा, कॉलेज, बाजारपेठ व तालुक्याच्या ठिकाणी जाण्यास मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
खासगी वाहतूक महाग असून सर्वसामान्य नागरिकांना ती परवडणारी नाही. त्यामुळे आमच्या गावासाठी किमान दिवसातून एक/दोन फेऱ्यांची एसटी बस सेवा ( खामगाव ते भोटा कठोरा कालवड व मच्छिंद्र खेळ) या मार्गावर सकाळी व संध्याकाळी बस सुरू करण्यात यावी, अशी विनंती आहे.
तरी सदर बाबीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून लवकरात लवकर आमच्या गावासाठी एसटी बस सेवा सुरू करण्यात यावी, ही नम्र विनंती.अशे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने खामगाव आगार प्रमुख यांना निवेदन देण्यात आले व एसटी बस वेळेवर न सुरू झाल्यास लोकशाही मार्गाने उपोषण करणार आहे असा ईशारा *राष्ट्रवादी चे शेख अयाज युवा कार्यकर्ते यांच्या वतीने दिन्यात आला*

Post a Comment
0 Comments