*पत्रकाराची अवैध गौणखनिज विरोधात तक्रार, तलाठ्याची पत्रकाराला जिवे मारण्याची धमकी*
--------------------
नांदुरा (प्रतिनिधी) नांदुरा तालुक्यातील ग्राम केदार येथील रहिवासी असलेले साप्ताहीक विदर्भ टायगर वृत्तपत्राचे संपादक किशोर इंगळे यांनी स्थानिक नदी पत्रातून अवैधरीत्या वाळू उपसा करून भरधाव वेगाने टीप्पर गावातील रस्त्यावरून वाहतात. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याला आळा बसावा या हेतूने किशोर इंगळे यांनी अवैध गौण खनिज विरोधात तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली. परंतु ही तक्रार केल्यावर स्थानिक तलाठी नितीन म्हस्के यांनी संपादक तथा पत्रकार किशोर इंगळे यांना धमकी देत वाळू उपशाची तक्रार का केली?. हा भाग माझ्या कार्यक्षेत्रात येतो तुझ्या तक्रारीमुळे मला वरिष्ठांना जवाब द्यावा लागेल. "तू जास्त मस्ती आला काय?" तुला पाहून घेईल, रेतीच्या गाडीखाली चिरडून टाकेल अशी जीवे मारण्याची धमकी दिली. सदर घटनेबाबत पत्रकार इंगळे यांनी नांदुरा पोलीस स्टेशनला तक्रार दिलीआहे.
सदर तलाठ्याचे अवैध व्यावसायिकांशी संबंध असून त्यांच्या कृपा आशीर्वादाने सर्रास हे अवैध गौण खनिजचे अवैध धंदे सुरू आहेत. तरी सदर तलाठी यांनी मला जिवे मारण्याची धमकी दिली आहे. यामुळे माझ्या जीवितास कुठल्याही प्रकारची हानी झाल्यास, माझ्यावर हल्ला झाल्यास याला सर्वस्वी जबाबदार तलाठी नितीन म्हस्के हे राहतील असे सदर तक्रारीत नमूद आहे.
म्हस्के तलाठी हे ७ ते ८ वर्ष झाले एकाच ठिकाणी कार्यरत आहे व ते तलाठी, तलाठी सांझा दहिवडी येथे मुख्यालयी राहत नसल्याने नागरिकांना त्रास होत आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
व्हॉट्सॲप नं.- 9764061273,

Post a Comment
0 Comments