Type Here to Get Search Results !

माटरगाव बुद्रुक येथे भरारी महिला ग्राम संघाच्या वतीने थोर समाज सुधारक संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी मोठ्या उत्सवात साजरी

 माटरगाव बुद्रुक येथे भरारी महिला ग्राम संघाच्या वतीने थोर समाज सुधारक संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी


निमित्त प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले . संत गाडगे महाराज यांचे विचार प्रासंगिक आहेत त्यांनी सांगितले की स्वच्छता हीच सेवा आहे त्यांचे विचार आत्मसात करून आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त भरारी ग्राम संघातील सदस्यांनी ग्राम स्वच्छता अभियान राबविले गाडगे महाराज हे फक्त संतच नव्हते तर थोर समाज सुधारक सुद्धा होते त्यांनी कचऱ्यातून संस्कार तर सेवेतून समाज क्रांती घडवून आणली देव दगडात नाही माणसात आहे हा त्यांचा संदेश आजही प्रेरणादायी आहे त्यांनी दिलेला स्वच्छतेचा वसा जोपासण्यासाठी आपण आपले गाव स्वच्छ व सुंदर ठेवूया

Post a Comment

0 Comments