Type Here to Get Search Results !

भाजपचा खामगाव नगर पालिकेवर दणदणीत विजय, आकाशभाऊ फुंडकर यांना मोठे यश.रजत नगरी खामगावात फुलले कमळ नगराध्यक्षपदी अपर्णा सागर फुंडकर.*



 *भाजपचा खामगाव नगर पालिकेवर दणदणीत विजय, आकाशभाऊ फुंडकर यांना मोठे यश.रजत नगरी खामगावात फुलले कमळ नगराध्यक्षपदी अपर्णा सागर फुंडकर.*


(उप संपादक सिध्देश्वर निर्मळ खामगांव)

खामगाव: अकोला पालकमंत्री तसेच खामगावचे आमदार आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने खामगावात दणदणीत यश प्राप्त केले आहे, भाजपाच्या झंजावाता पुढे सर्वच पक्ष पार भुईसपाट झाले. 

भाजपाने नगरसेवकांच्या 29 जागा जिंकत एक हाती वर्चस्व स्थापित केले. तर खामगावच्या नगराध्यक्षपदी भाजपाच्या सौ अपर्णाताई फुंडकर यांनी काँग्रेसच्या स्मिता किशोर 'भोसले यांचा पराभव केला. *सौ अपर्णाताई *फुंडकर* यांना २५ हजार ६५४ मते मिळाली तर

त्यांच्या प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या स्मिता भोसले यांना १४,८८५ मते प्राप्त झाली, निवडणुकीचा निकाल घोषित होताच भाजपा कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत एकच जल्लोष केला जय श्रीराम च्या जय घोषाने संपूर्ण रजत नगरी खामगाव फुलून गेली

होती.

अकोलासंपूर्ण  व बुलढाणा जिल्ह्याचे लक्ष खामगाव नगरपालिकेच्या निवडणुकीवर लागले होते आकाश फुंडकर यांच्या वहिनी अपर्णाताई फुंडकर यांना नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरवल्याने विरोधकांनी घराणेशाहीचा आरोप केला होता परंतु या सर्व आरोपांना पुरून उरित आकाश फुंडकर

यांनी भाजपाचे निर्विवाद वर्चस्व खामगावात साबित केले 35 पैकी 29 जागी त्यांनी भाजपाचे उमेदवार निवडून आणीत खामगाव हा भाजपाचा बालेकिल्ला असल्याचे परत एकदा साबित केले, सर्व विजयी उमेदवारांची शहरात विजय रॅली काढण्यात आली गुलाल उधळीत व ढोल ताशाच्या आवाजावर नृत्य करीत भाजपा कार्यकर्त्यांनी आपला विजय साजरा केला.

Post a Comment

0 Comments