Type Here to Get Search Results !

कोटीच्या कोटी रुपयातून विकास कोणाचा ? खामगांव शहराचा.... की सत्ताधाऱ्यांच्या खिश्याचा ? भोसले ताई बदल करणार

 कोटीच्या कोटी रुपयातून विकास कोणाचा ? खामगांव शहराचा.... की सत्ताधाऱ्यांच्या खिश्याचा ?

भोसले ताई बदल करणार


खामगाव

प्रतिनिधी

खामगांव नगरपालिकेत जनतेच्या मतांनी निवडून आलेले सत्ताधारी आम्ही  कोटीच्या कोटी रुपये खर्च करून विकास केला असे सांगुन आज पुन्हा तुमच्या दारात येऊन मते मागत आहेत, परंतू खरा प्रश्न असा आहे की, हे ५०० कोटी खर्चले कुठे? विकास झाला कोणाचा ? खामगांवचा? की ठेकेदार सत्ताधा-यांच्या खास गटाचा ? कारण वास्तव जनतेला स्पष्ट दिसत आहे, ठिक ठिकाणी तुंबलेल्या नाल्या, घाणीचे ढीग व डेंग्युच डोंगर, खड्रेमय रस्ते, पावसाळ्यात चिखलाचे दलदल, अंधारात बुडालेले पथदिवे, कुलुप लागलेले सार्वजनिक शौचालय आणि सुरूवातीपासून निकृष्ट दर्जाची कामे. हेच ते शाश्वत विकासाचे पितळ!


आता निर्णय बदलण्याची व शहराच्या  विकासासाठी मतदान करण्याची वेळ जवळ आली आहे. 


महाविकास आघाडी च्या नेतृत्वाखाली पक्षाचे नगराध्यक्ष स्मिताताई किशोर भोसले आणि सर्व महाविकास आघाडीचे नगरसेवक उमेदवार यांना आपण आशीर्वादरूपी मते देवुन विजयी करावे, खामगांव शहरात पारदर्शक कामे, मजबूत पायाभूत सुविधा, स्वच्छता, सुरक्षितता, सुयोग्य नियोजन आणि सर्व समावेशक विकास करण्याची आम्ही ग्वाही देतो. हा विकास खामगांवचा असे कुणाच्यातरी खिशाचा नाहीं।


रेल्वे गेट चा अपूर्ण अंडरपास


त्यांची झालेली दूरावस्था


तुमच्या बहुमुल्य मतांनी निवडून येऊन शहरा ऐवजी स्वतःचा शाश्वत विकास करून आपल्या मतांचा वापर स्वतःची पॉवर वाढविणाऱ्यांना मत न देता या निवडणूकीत त्यांना पराभवाची धूळ चारा, त्यांना पुन्हा स्वतःचा विकास करण्याची संधी देऊ नका खामगांवच्या उज्वल भविष्याचे स्वप्न फक्त पंच बार्षिक निवडणूकीत दाखविणाऱ्या विरोधी उमेदवारांना त्यांनी यापूर्वी दिलेल्या खोट्या आश्वासनांची आठवण करून द्या ! २४ तास पाणी देण्याया 'संकल्प' करणारे २४-२४ दिवस सुद्धा पाणी देऊ शकत नाहीत ही वस्तुस्थिती आहे व हे स्वविकास बहाद्दर तुमच्याकडे मत मागायला आल्यावर याची जाण त्यांना करून द्यायले विसरू नका. तुमच्या अमुल्य मतांद्वारे निवडून येऊन लोकप्रतिनिधी म्हणून जनतेची सेवा करण्याऐवजी ठेकेदारी करण्याकडे वाटचाल करून लाखो रूपयांची खळगी भरणाऱ्या या लोकप्रतिनीधींना मतदान करण्यापूर्वी रेल्वेगेट का अपूर्ण अंडरपास वर्षानुवर्षे काम सुरू असलेला घाटपूरीचा अपूर्ण रस्ता, पावसाळ्यात रस्त्यावरून वाहणाऱ्या कृत्रिम नद्या व डांसिंग रस्ते या पासून सुटका झाली नाही याचा विचार करून मतदान करा

Post a Comment

0 Comments