*खामगाव (प्रतिनिधी)* विराट मल्टीपर्पज फाउंडेशन खामगाव च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने 14 डिसेंबर 25 रोजी सकाळी 10 वाजता खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशन जवळील पत्रकार भवन येथे विविध उपक्रम ज्यामध्ये दिव्यांग उपयुक्त साधने नोंदणी, आरोग्य,कौशल्य रोजगार, शासकीय शिक्षण व शासकीय कार्यालयातील अडचणी विषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला विविध पक्षांचे नेते, सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांचे पदाधिकारी,सामान्य रुग्णालयातील डॉक्टर,अभियंता, प्राध्यापक आदी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
आपल्या कार्य कुशलतेतून आपले नाव उंचविणाऱ्या दिव्यांग बांधवांचा सत्कार करण्यात येणार आहे.आयुष्यमान कार्ड, (आभा कार्ड) वैश्विक ओळखपत्र, यु डी आय डी कार्ड, ई श्रम कार्ड,संजय गांधी निराधार योजना फाईल, आदींची या ठिकाणी निशुल्क नोंदणी व वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास जिल्हा भरातील दिव्यांग बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन विराट मल्टीपर्पज फाउंडेशन खामगावच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Post a Comment
0 Comments