Type Here to Get Search Results !

जलंब ग्रामपंचायतीकडून खोटी ग्रामसभा दाखवून बनावट सह्या केल्याबाबत ग्राम पंचायत सदस्य गोपाल मोहे यांनी केली पंचायत समित ला तक्रार दाखल चौकशी करून कारवाई करावी

 *जलंब ग्रामपंचायतीकडून खोटी ग्रामसभा दाखवून बनावट सह्या केल्याबाबत ग्राम पंचायत सदस्य गोपाल मोहे 


 यांनी केली पंचायत समित ला तक्रार दाखल  चौकशी करून कारवाई करावी*                   (ग्रामीण प्रतीनीधी)            जलंब येथील ग्रामपंचायतीने खोटी ग्रामसभा दाखवून ग्रामपंचायत सदस्य श्री. गोपाल शालीग्राम मोहे यांची बनावट / खोटी सही केलेली आहे, हे बाब ऑनलाईन रेकॉर्ड तपासणीदरम्यान स्पष्टपणे निदर्शनास आलेली आहे.

सदर प्रकरणी चौकशी केली असता श्री. गोपाल शालीग्राम मोहें यांना ग्रामपंचायतीकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.

तसेच दिनांक ०७/१२/२०२५ रोजी जलंब ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेतल्याचा ठराव ऑनलाईन रेकॉर्डवर दाखविण्यात आलेला आहे. प्रत्यक्षात सदर अहवाल हा केवळ टेबलवर तयार करण्यात आला असून त्यावर इतर लोकांच्या सह्या करण्यात आल्या आहेत.

असे असतानाही ग्रामपंचायतीने मनमानी पद्धतीने खोटी ग्रामसभा दाखवून जनतेची तसेच शासनाची फसवणूक केलेली आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर असून लोकशाही प्रक्रिया व ग्रामपंचायत कायद्याचा भंग करणारी आहे.

तरी महोदय, आपण सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित दोषी सरपंच / सचिव व इतर संबंधितांवर तात्काळ व कडक कायदेशीर कारवाई करावी.

Post a Comment

0 Comments