पत्रकार दिनानिमित्त आयोजनाची बैठक संपन्न
(उप संपादक सिध्देश्वर निर्मळ खामगांव)
खामगाव :तालुका महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने येणाऱ्या पत्रकार दिनानिमित्त विविध कार्यक्रमांच्या नियोजनासाठी बैठक संपन्न झाली. ही बैठक खामगाव येथील पत्रकार भवनात आयोजित करण्यात आली होती.बुलढाणा जिल्हा अध्यक्ष प्रमोद बापू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे खामगाव तालुका अध्यक्ष सचिन बोहरपी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. बैठकीत पत्रकार दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा, नियोजन व जबाबदाऱ्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.यावेळी शांताराम तायडे, नाना हिवराळे, संतोष धुरंदर, संदीप राठोड, गजानन धनदरे, कैलास गाडे, विनोद देशमुख, सिद्धेश्वर सारजने, दगडू तायडे, गजानन सोनवणे, , तौसिफ भाई, तमसील भाई, धनंजय गोतमारे, शेख फारूक, दिलीप वानखडे, अनंतसिंग बोराडे, लुकमान परवेज, गजानन खंडारे, उमेश वाकोडे, उमेश मुंडे आदी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.बैठकीत पत्रकारांच्या विविध समस्या, संघटना अधिक मजबूत करण्याबाबत तसेच पत्रकार दिन अधिक उत्साहात साजरा करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Post a Comment
0 Comments