Type Here to Get Search Results !

दिवंगत भाजपा जिल्हाध्यक्ष स्व. पंजाबराव देशमुख (नाना बापू) स्मृती प्रतिष्ठान, जळगाव जामोद यांच्या वतीने तसेच वारकरी साहित्य परिषद तालुका जळगाव जामोद व संग्रामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली भव्य वारकरी महिला भजनी दिंडी स्पर्धा मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात संपन्न झाली.

या स्पर्धेत जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील विविध गावांमधून आलेल्या महिला भजनी दिंडींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. टाळ-मृदंगाच्या गजरात, हरिनामाच्या जयघोषात सकाळी दुर्गा चौक येथून दिंडीला प्रारंभ झाला. तुकाराम चौक मार्गे दिंडी देवाशीष लॉन्स येथे पोहोचली. संपूर्ण परिसर भक्तीरसात न्हाऊन निघाला होता. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून राज्याचे कामगार मंत्री ना. आकाशभाऊ फुंडकर, माजी मंत्री तथा विद्यमान आमदार श्री.संजयजी कुटे उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून ह.भ.प. श्री. गजानन महाराज गायकरवाड (अध्यक्ष, वारकरी साहित्य परिषद, बुलढाणा जिल्हा भाग १), ह.भ.प. श्री. अनंता महाराज महाले (अध्यक्ष, वारकरी साहित्य परिषद, बुलढाणा जिल्हा भाग २) तसेच ह.भ.प. श्रीमती मेघाताई सेतवाल (महिला अध्यक्षा) यांची उपस्थिती लाभली.

या वेळी मान्यवरांनी वारकरी परंपरेचे महत्त्व विशद करत महिला भजनी दिंडींनी समाजात अध्यात्म, संस्कार व एकतेचा संदेश देत असल्याचे प्रतिपादन केले. सहभागी सर्व दिंडींना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वारकरी साहित्य परिषद, स्व. पंजाबराव देशमुख स्मृती प्रतिष्ठान तसेच तालुक्यातील वारकरी, महिला कार्यकर्ते व स्वयंसेवकांनी मोलाचे सहकार्य केले. संपूर्ण कार्यक्रम शांततामय व शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाला.#वारकरी #वारकरीपरंपरा

#भजनीदिंडी #महिलाभजनीदिंडी

#भक्तीमयवातावरण #जळगावजामोद

Post a Comment

0 Comments