Type Here to Get Search Results !

चांदुर बिस्वा येथील शासकीय जमिनीमधून हजारो ब्रास गौणखनिज चोरी, महसूल प्रशासनाची सुस्त भूमिका उघड

 चांदुर बिस्वा येथील शासकीय जमिनीमधून हजारो ब्रास गौणखनिज चोरी, महसूल प्रशासनाची सु




स्त भूमिका उघड

(नांदूरा प्रतीनिधी)

चांदुर बिस्वा (ता. नांदुरा_) येथील शासकीय जमिनीमधून हजारो ब्रास गौणखनिजाची बेकायदेशीर उत्खनन व चोरी होत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे ही बाब अनेक महिन्यांपासून सुरू असताना महसूल व खनिकर्म विभाग मात्र याकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

मौजे चांदुर बिस्वा परिसरातील शासकीय गट क्रमांक ३८६ मधील १.५ हेक्टर ई क्लास जमिनिमधून जेसीबी व ट्रॅक्टरद्वारे कोणतीही परवानगी नसताना हजारो ब्रास गौणखनिज चोरी करून वाहतूक करण्यात आली. यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. उलट चोरी करणाऱ्यांना अभय मिळत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. प्रशासनाची ही सुस्त आणि उदासीन भूमिका संशयास्पद असून, यामागे कोणाचे पाठबळ आहे, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

या बेकायदेशीर उत्खननामुळे परिसरातील शेती, जलस्रोत आणि पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे. रस्त्यांची अवस्था खराब झाली असून ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच संबंधित निष्क्रिय अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात यावी, अन्यथा २५ जानेवारी २०२६ पासून उपोषण करण्यात येईल असा इशारा नांदुरा तहसीलदार यांना निवेदनाद्वारे नागरिकांकडून देण्यात आला आहे. आता तरी नांदुरा तहसीलचे महसूल प्रशासन याकडे लक्ष देऊन कार्यवाही करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments