खामगाव :- खामगाव शहरातील गॅस एजन्सी मध्ये सध्या परिस्थितीत घरगुती गॅस सिलेंडर साठी गोरगरीब मजूर लोकांना आपले कामधंदे सोडून लावा लागत आहेत रांगा. त्यांना गॅस एजन्सी कडून ऑनलाईन नंबर लावल्यानंतर चार ते पाच दिवसांनी आपल्याला सिलेंडर मिळेल असे उत्तर गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्याकडून मिळत आहेत. परंतु शहरातील व ग्रामीण भागातील छोटे मोठे व्यावसायिक हॉटेल वाले यांच्याकडे सर्रास घरगुती गॅस सिलेंडरचा वापर सुरू आहे असे दिसून येत आहे. व्यावसायिक हॉटेलवर घरगुती गॅस सिलेंडर वापरण्यास सक्त मनाई असतानाही पुरवठा विभाग गप्प का असा सवाल जनसामान्य मध्ये होत आहे. या गंभीर बाबीकडे जिल्हा पुरवठा अधिकारी यांची लक्ष देण्याची गरज. असा सवाल थेट प्रशासनावर नागरिक करत आहेत.

Post a Comment
0 Comments