*सरदार पटेल दिव्य रत्न अवार्ड 2025 नी सुरजभैय्या यादव गुजरात मध्ये सम्मानित*
*दिनांक 10/12/2025*
खामगांव : येथील एकनिष्ठा गौ सेवा रक्तसेवा फाउंडेशन गेल्या अनेक वर्षा पासून दिव्यांग गरजू रुग्णांना रक्तदान व आर्थिक मदत देऊन सेवाकार्य करत आहे याच सेवाकार्यांची दखल गायत्री विकलांग मानव मंडल बडोदरा गुजरात या संस्थेनी घेऊन लोहपुरूष श्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व तसेच जागतिक दिव्यांग दिवस 7 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता दिपप्रजवलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली आपल्या महाराष्ट्र राज्यातील सेवाभावी संस्था एकनिष्ठा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुरजभैय्या यादव, बुलढाणा जिल्हाध्यक्ष शेखर रिछारीया, यांना श्री सरदार वल्लभभाई पटेल दिव्य रत्न अवॉर्ड 2025 शॉल, शिल्ड, प्रमाणपत्र देत बडोदरा गुजरातला त्यांना सम्मानित करण्यात आले. यावेळी संस्था संचालक श्रीमती रुकमणी शाह, संस्था प्रमुख श्री सुनिलभाई गीगल, डॉक्टर रविंद्र भोळे पुणे आदि मान्यवरांनी सम्मान करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. व तसेच दिव्यांग लोकांना ब्लॅंकेट वितरण करण्यात आले या सम्मान समारोह मध्ये देशभरातील 151 संस्थांना गायत्री विकलांग मंडल बडोदरा यानी सम्मानित केले. अशी माहिती सुरेश हुंबर्डे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
--------------------------------------------

Post a Comment
0 Comments