Type Here to Get Search Results !

बुधवार रोजी माटरगांव बु; येथे संविधान गौरव दिनानिमित्त संविधान तज्ञ डॉ.सुरेश माने यांचे व्याख्यान..*

 *बुधवार रोजी माटरगांव बु; येथे संविधान गौरव दिनानिमित्त संविधान तज्ञ डॉ.सुरेश माने यांचे व्याख्यान..*


समस्त संविधान प्रेमींनी उपस्थित रहावे विजय इंगळे


यांचे आवाहन..


दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा माटरगांव बु; येथे २६ नोव्हेंबर २०२५ रोजी "संविधान गौरव दिवस" साजरा करण्यात येत आहे.

        भारतीय संविधान दिनानिमित्त भारतभर संविधान दिवस विविध क्षेत्रात विविध प्रकारे साजरा होत असतो. याचाच एक भाग म्हणून भारतीय संवैधानिक हक्क अधिकार व त्या बद्दलची माहिती आपल्या जिल्ह्यातील सर्वांपर्यंत पोहचावी यासाठी आम्हीं पण आपल्या माटरगांवात गेल्या काही वर्षांपासून हा वैचारिक उपक्रम "संविधान गौरव दिवस" साजरा करून राबवत आहोत,जेणेकरून सुजाण नागरिक निर्माण होतील,संविधानाचा आदर करणारा भारतीय समाज निर्माण होईल, असं केल्याने आपला भारत अधिक सक्षम होईल या आशेने या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे.

या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका मा.छायाताई बोदडे यांच्या संचाचा संविधान प्रबोधन पर दणदणीत भीम गीतांचा व संविधान तज्ञ मा. ॲड.डॉ.सुरेश माने यांचा जाहीर प्रबोधनाचा/व्याख्यानाचा कार्यक्रम दिनांक २६ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत माटरगांव बु; ग्रापंचायत समोरील माँ जिजामाता चौक येथे आयोजीत करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील विविध पक्ष संघटनांची संविधानप्रेमी नेते व पदाधिकारी मंडळी प्रतिनिधिक स्वरूपात उपस्थित राहणार आहेत तरी आपण सर्व संविधान प्रेमी बहुजनांनी/ जनतेने या कार्यक्रमाला आपले कर्तव्य समजून बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन विजय इंगळे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments