Type Here to Get Search Results !

प्रभाग 8 मध्ये तिरंगी लढत निश्चित…! उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा अपक्ष उमेदवार सौ. रुपाली नवथळे यांना पाठिंबा.!

 प्रभाग 8 मध्ये तिरंगी लढत निश्चित


उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा अपक्ष उमेदवार सौ. रुपाली नवथळे यांना पाठिंबा.!


शेगाव (महाराष्ट्र दर्शन न्युज ) – नगरपरिषद निवडणुकीत अर्ज छाननीनंतर अनेकांचे अर्ज बाद झाले असले तरी प्रभाग 8 मध्ये मात्र तिरंगी लढतीची स्थिती स्पष्ट झाली आहे. पक्षाकडून उमेदवारीची अपेक्षा ठेवूनही अपक्ष म्हणून मैदानात उतरलेल्या सौ. रुपाली गजानन नवथळे यांनी मोठी चुरस निर्माण केली असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचा त्यांना समर्थक म्हणून पाठिंबा मिळाल्याने समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत.


प्रभागातील “विकासकामांचा अभाव” हा मुद्दा नागरिक सातत्याने मांडत असल्याने, नवथळे यांच्या उमेदवारीला जनतेकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांनी 19 नोव्हेंबर रोजी सौ. रुपाली नवथळे यांना अधिकृत पत्र देत संपूर्ण पाठिंबा जाहीर केला.

प्रभाग 8 मध्ये सौ. मनीषा राजेश पारखेडे (काँग्रेस), सौ. अलका संजय खानझोडे (भाजप), सौ. रुपाली गजानन नवथळे (अपक्ष – शिवसेना उ.बा.ठा. गट समर्थित), सौ. प्रतिभा किरण उगले (अपक्ष) यांचे अर्ज कायम आहेत. 

25 नोव्हेंबर हा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून त्यानंतर अंतिम चित्र स्पष्ट होईल. मात्र नवथळे यांना मिळालेला शिवसेनेचा पाठिंबा आणि जनतेचा वाढता प्रतिसाद लक्षात घेतल्यास या प्रभागात तिहेरी लढत अटळ असल्याचं दिसतं.



“प्रभाग 8 मध्ये शिवसेनेचाच विजय होईल” – जिल्हा उपप्रमुख अविनाश दळवी


“काही तांत्रिक कारणांमुळे सौ. रुपाली नवथळे यांना ए.बी. फॉर्म देता आला नाही. परंतु त्या आमच्याच अधिकृत समर्थित उमेदवार असून प्रभाग 8 मध्ये शिवसेनेचाच उमेदवार विजयी होईल. याची आम्हाला पूर्ण खात्री आहे.” असे शिवसेना (उ.बा.ठा.) गटाचे जिल्हा उपप्रमुख अविनाश दळवी यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments