Type Here to Get Search Results !

शेगाव नगरपालिका निवडणूक २०२५ प्रभाग 7 मधून अंबादास उर्फ प्रमोद इंगळे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार.! प्रचाराला दमदार प्रतिसाद, विकासाचे विजन स्पष्ट


 शेगाव नगरपालिका निवडणूक २०२५

प्रभाग 7 मधून अंबादास उर्फ प्रमोद इंगळे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार.! प्रचाराला दमदार प्रतिसाद, विकासाचे विजन स्पष्ट



शेगाव प्रतिनिधी – शेगाव नगरपरिषद निवडणूक २०२५ साठी प्रभाग क्रमांक ७ (७,अ) मधून अंबादास उर्फ प्रमोद बळीराम इंगळे यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदवार म्हणून निवड करण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर होताच संपूर्ण प्रभागात आनंदाचे वातावरण असून काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष करत इंगळे यांचे स्वागत केले.


प्रभाग 7 हा शहरातील सर्वात मोठा आणि महत्वाचा प्रभाग असल्याने येथे होत असलेली प्रत्येक हालचाल राजकीयदृष्ट्या महत्वाची मानली जाते. अशा प्रभागात काँग्रेसने युवा स्वच्छ प्रतिमा असलेले आणि सातत्याने जनसेवा करणारे अंबादास इंगळे यांच्यावर विश्वास टाकत उमेदवारी दिल्याने सर्व स्तरांत चर्चा रंगल्या आहेत.


अंबादास इंगळे हे गेल्या अनेक वर्षांपासून ई-सेवा केंद्र चालवून नागरिकांची शासकीय कामे प्रामाणिकपणे व तत्परतेने करून देतात. त्यामुळे त्यांचा सर्वसामान्यांपासून वयोवृद्धांपर्यंत घट्ट संपर्क तयार झाला आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर इंगळे यांनी तत्काळ प्रचाराची धुरा हाती घेतली असून घरोघरी भेटी देत मतदारांशी संवाद सुरू केला आहे.


प्रचाराच्या पहिल्या काही दिवसांतच प्रभागातील नागरिकांकडून त्यांना प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून महिलांपासून युवकांपर्यंत सर्वांनीच इंगळे यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. स्वच्छ कामकाज, जवाबदारी, पारदर्शकता आणि जनसेवा या चार गोष्टींवर आधारित विकासाचे स्पष्ट विजन त्यांनी मतदारांसमोर मांडले आहे. रस्ते, पाणी, स्वच्छता, दिवाबत्ती, आरोग्य सुविधा, युवकांसाठी उपक्रम आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सेवा केंद्र यांसारख्या विविध मुद्द्यांवर इंगळे यांची ठोस योजना आहे.


शहराच्या वाढत्या गरजांनुसार प्रभाग ७ चे सर्वांगीण विकासाचे स्वप्न साकार करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. “प्रभागातील प्रत्येक मतदार हा माझा कुटुंबिय असून त्यांच्या अडचणी सोडवणे हीच माझी प्राथमिकता असेल,” असे इंगळे यांनी सांगितले.


काँग्रेसच्या या उमेदवारामुळे प्रभाग ७ मधील लढत अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे इंगळे यांच्या नावाला मिळत असलेला प्रतिसाद पाहता काँग्रेसच्या खेम्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रभाग ७ मध्ये विकासाचे नवे पर्व सुरू करण्यासाठी सर्व स्तरांतून अंबादास उर्फ प्रमोद इंगळे यांना पाठिंबा मिळत असल्याचे दृश्य सध्या स्पष्टपणे पाहायला मिळत आहे.

Post a Comment

0 Comments