Type Here to Get Search Results !

जलंब ग्रामपंचायत सदस्य गोपाल मोहे यांचा विविध मागण्यासाठी उपोषनाचा ईशारा*

 *जलंब ग्रामपंचायत सदस्य गोपाल मोहे यांचा विविध मागण्यासाठी उपोषनाचा ईशारा* 


: - जलंब गावातील  मागण्या तात्काळ  पूर्ण


करण्यात यावे अन्यथा  (ग्रामीण प्रतीनीधी जलंब)

        पंधरा दिवसानंतर जलंब  ग्रामपंचायत समोर उपोषणाचा ईशारा ग्रामपंचायत सदस्य गोपाल मोहे व गावातील काही प्रतिठीत नागरींकान कडुन देण्यातआला .

   वरील विषयाला अनुसरून ग्रामपंचायत जलंब यांना लेखी स्वरूपात दिले खालील संपूर्ण मागण्या ह्या रास्त असून या तात्काळ आठ ते पंधरा दिवसात मार्गी लावण्यात यावे तसे आम्हाला माहिती कळवावी अन्यथा पंधरा दिवसानंतर शिवसेनेच्या वतीने शिवसेना ( उ. बा.ठा )व समस्त गावकऱ्यांच्या वतीने उपोषणाचा इशारा देण्यात येत आहे. त्या सदस्यांचे म्हणणे नुसार गावातील काही योजना ह्या फक्त कागदो पत्री चालु असुन त्या योजना बंध स्वरूपात आहे त्या अशा की  १) प्लास्टिक युनिट तत्काळ चालू करण्यात यावे २) घनकचरा व्यवस्थापन युनिट व्यवस्थित रित्या काम करून घ्यावे तसेच त्याच्यामध्ये काय चालू आहे त्याच्याकडे पण लक्ष ठेवून माहिती देण्यात यावी ३) गावातील पाणीपुरवठा विहिरीवरील सौर पंप तसेच तात्काळ टेस्टिंग करून गावाला त्या विहिरीतून त्या पंपाद्वारे पाणी देण्यात यावे व तेथील मीटर रद्द करण्यात यावे ४) गावातील व्यायाम शाळा त्वरित चालू करण्यात यावी ५) सावित्रीबाई फुले वाचनालय व पुस्तिका तात्काळ चालू करण्यात यावी ६) जिल्हा परिषद मुलांची शाळा व मुलींची शाळा येथे जो आरो प्लांट लावलेला आहे तो त्वरित चालू करण्यात यावा ७) जिल्हा परिषद मुलांची शाळा व मुलींची शाळा येथे ग्रामपंचायतचा नळ व्यवस्थित रित्या पाणी येते किंवा नाही याची माहिती घेऊन त्यांना त्यांच्या टाकेमध्ये पाणी स्टोरेज करण्यासाठी उपाय योजना तात्काळ करण्यात यावी ८) रेल्वे गेट तात्काळ चालू करण्यात येण्यासाठी उपाययोजना करणे कारण खामगाव बस व शेगाव बस व्यवस्थित रित्या चालू करण्यासाठी काहीतरी उपाययोजना करणे ९) गावातील मेन रस्ता त्यावरील डांबरीकरण तात्काळ करण्यात यावे व त्या ठेकेदाराला व्यवस्थितरित्या बोलावून घेऊन तात्काळ काम करण्यात यावे १०) राजपूत पुरा गल्लीतील शंकर राजपूत ते महिपाल सिंग राजपूत यांच्या घरापर्यंत रस्ता करण्यात यावे ११) गावातील प्रत्येक चौकामध्ये कचराकुंड्या होत्या त्या परत तात्काळ लावण्यात यावे १२) गावातील प्रत्येक चौकामध्ये हायमस्ट लाईट जे लावलेले होते ते बंद अवस्थेत आहेत ते तात्काळ दुरुस्त करण्यात यावे १३) जिल्हा परिषद मुलांची शाळेमधील जी अंगणवाडी आहे त्या अंगणवाडीमध्ये सौर पॅनल बंद आहे ते तत्काळ दुरुस्त करण्यात यावी व तसेच गावातील 1 ते 6 अंगणवाडी केंद्रामध्ये नळ कनेक्शन ची तात्काळ जोडणी करून देण्यात यावी. १४) अण्णाभाऊ साठे नगर येथील हाय मार्क्स वरील लाईट दुरुस्त करण्यात यावे १५) श्री पायी विद्यालय जाणारा जुन्या बस स्टॅन्ड ते  रेल्वे लाईन पर्यंत रस्ता व्यवस्थितरित्या  करण्यात यावा १६) रामेश्वर मोहे ते बाळू गिऱ्हे यांच्या घराजवळील सांडपाण्याची व्यवस्थितरित्या काम करण्यात यावे त्या रस्त्यात मुरूम टाकण्यात यावे १७) गावातील मोकाट जनावरांसाठी कोंडवाडा लवकरात लवकर तयार करण्यात यावा १८) जलम गावामध्ये पाणीपुरवठा विहिरींना पुष्कळ प्रमाणात पाणी असल्यामुळे तिसऱ्या ते चौथ्या दिवशी गावांमध्ये पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात यावे १९) श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे सौंदर्यकरण  करण्यात यावे २०) हिंदू सूर्य महाराणा प्रताप  पुतळ्याचे सौंदर्यपण करण्यात यावे २१) संपूर्ण गावातील नाली साफसफाई लवकरात लवकर करण्यात यावी . २२) जनावरांचा गुरांचा दवाखान्याच्या बाजूचा प्रसादन गृह अंगणवाडी तसेच शॉपिंग सेंटर यांच्यासाठी खुले करण्यात यावे . 

तरी वरील मागण्या 3 डिसेंबर 2025 पूर्वी पूर्ण करण्यात याव्या अन्यथा ग्रामपंचायत जलम समोर उपोषण करण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी ही ग्रामपंचायत प्रशासनाची राहील.असा ईशारा ग्रामपंचायत सदस्य गोपाल मोहे यांनी जलंब ग्रामपंचायत ला दिला

Post a Comment

0 Comments