काँग्रेसच्या उमेदवार सौ. स्मिताताई भोसले यांच्या सह उमेदवार
प्रभाग क्र.5 शुभम काळोसे व जांबेताई यांना
प्रचारादरम्यान मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद
खामगाव
खामगाव नगर परिषद निवडणुकीसाठी प्रचाराचा चिंतामणी मंदिर केशवनगर आदी भागात करण्यात आला असून, काँग्रेसच्या वतीने देखील शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये जावून शहरवासियांच्या भेटी गाठी घेणे सुरु केले आहे. या प्रचारादरम्यान महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस च्या उमेदवार असलेल्या सौ. स्मिताताई किशोरआप्पा भोसले यांना जनतेतून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळतांना दिसून येत आहे.
तर प्रभाग क्रमांक पाच मधील उमेदवार शुभम काळुसे व नंदाताई जांभे यांच्या सह
काँग्रेसने प्रत्येक प्रभागात नव्या दमाचे कार्यकर्ते उभे केले असून, प्रत्येक प्रभागात काँग्रेस व महाविकास आघाडीचा उमेदवार ताकदीनिशी प्रचार करीत आहे.
इतर पक्ष नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देण्याच्या धांदलीत असतांना काँग्रेसने ने मात्र, आधीपासूनच शहरात दांडगा संपर्क असलेल्या किशोरआप्पा भोसले यांच्या पत्नी सौ. स्नाताताई भोसले यांनाच आधीची उमेदवारी दिल्याने त्यांनी आधीपासूनच जनतेत जावून काम सुरु केले होते.
माजी नगरसेवक किशोर आप्पा भोसले यांचा शहरात असलेला दांडग
जनसंपर्क व समाजकार्यात असलले त्यांचे योगदान व राजकीय ही त्यांची जमेची बाजू आहे.
शहरातील विविध प्रभागांत काढण्यात येणाऱ्या पदयात्रा, पर-घर संपर्क अभियान व कोपरा सभांना नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावल्याने स्थिताताईना आत्मविश्वास अधिक दुगावला आहे. प्रचार मोहीमेदरम्यान स्मिताताई भोसले यांनी सर्वप्रथम मी संपुर्ण पाच वर्ष सातत्याने आपल्या संपर्कात राहील व शहरतील प्रमुख समस्या जसे की विण्याच्या पाण्याचा असमान पुरवठा, खडेमुक्त रस्ते, स्वच्छता व्यवस्था, नागरिकांसाठी आरोग्य,
बाजारपेठेतील वाहतूक कोंडी, तरुणांसाठी रोजगार संधी व महिलांसाठी सुरक्षा यांसारखे मुद्दे प्रभावीपणे मांडले. शहर
विकासासाठी सर्वसमावेशक आराखडा राबवण्याच्या त्यांच्या आश्वासनाला जनतेचा भरभरून पाठिंबा मिळत आहे.
स्थानिक नागरिक, व्यापारी, सामाजिक संस्था, तसेच महिला बचत गटांचे सौ. भोसले यांना समर्थन मिळत असून, नगराध्यक्ष पदाच्या लढतीत काँग्रेस पक्षाला मजबूत गती मिळाल्याचे जाणवत आहे. तरुण मतदारही मोठ्या संख्येने प्रचारात सहभागी होत आहेत. निवडणुकीचे दिवस जवळ येत असल्याने राजकीय वातावरण अधिक चुरशीचे बनले आहे. विविध स्तरांवरील मिळणारा पाठिंबा पाहता काँग्रेस उमेदवार सौ. स्मिताताई भोसले नगराध्यक्ष पदासाठी भक्कम उमेदवार ठरत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे
तर आज चिंतामणी मंदिर परिसर केशवनगर घाटपुरी नाका साई मंदिर भागातील प्रभाग क्रमांक पाच मधील मतदारांच्या भेटीगाठी घेण्यात आल्या यावेळी प्रभागातील तरुण तडफदार उमेदवार शुभम दादा काळुसे व जांभे ताई
यांना वार्डातील प्रतिसाद पाहता काँग्रेस पक्षासाठी
संजीवनी यास प्रभागातून मिळणार असल्याचे दिसून येत आहे

Post a Comment
0 Comments