Type Here to Get Search Results !

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या विदर्भ आरोग्य प्रमुख पदी सुरज यादव*

 *अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या विदर्भ आरोग्य प्रमुख पदी सुरज यादव*



*दिनांक 24/01/2025*

खामगांव :- समाज सेवेत सदैव अग्रेसर असलेले आपल्या सर्वांचे परिचित सुरज यादव हे गेल्या 12 वर्षा पासून एकनिष्ठा गौ -सेवा रक्तसेवा फाउंडेशनच्या वतीने गरीब गरजु दिन दुबळ्या लोकांच्या पाठीशी ठामपने उभे राहून रक्तदान , आर्थिक मदत व शासकीय योजने मार्फत जनसेवा करत आहे. अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. मनोहर सुने ,राष्ट्रीय उपाध्यक्ष युसुफ खान ,राष्ट्रीय सरचिटणीस सुरेश सावळे , महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलासबाप्पु देशमुख यांनी सुरज यादव यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांची अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ्याच्या विदर्भ आरोग्य प्रमुख पदी नियुक्तीपत्र देऊन निवड केली. सुरज यादव यांच्या सामाजिक कार्यशैलीवर विश्वास ठेवुन त्यांना आरोग्य विभागाची जवाबदारी देण्यात आली. सुरज यादव यांना ही जवाबदारी मिळाली असता त्यांनी ग्रामीण पत्रकार संघाचे आभार मानले. सुरज यादव यांच्यावर नागरिक मिञ मंडळी त्यांच्या चाहत्या कडून सर्व स्तरावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments