Type Here to Get Search Results !

*ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने तहसिलदार यांना विविध मागण्यासाठी निवेदन*

 





ऑल इंडिया पँथर सेना बुलढाणा जिल्हा, ता.मोताळा यांच्यावतीने 

मा. तहसीलदार साहेब तालुका मोताळा यांच्यामार्फत 

मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य मुंबई 

यांना परभणी ते मुंबई लॉंग मार्च निघालेल्या मोर्चातील विविध मागण्यांबाबत व लॉंग मार्चच्या समर्थनार्थ निवेदन देण्यात आले त्यामध्ये परभणी ते मुंबई लॉंग मार्च निघालेला असून गेली 4 दिवस झालं भीम अनुयायी रस्त्याने चालत आहेत. लॉंग मार्च समर्थनार्थ ऑल इंडिया पॅंथर सेना निवेदन देण्यात आले असून खालील मागण्या तातडीने मान्य करत या राज्यव्यापी आंदोलनाला न्याय द्यावा! 


1) देशद्रोही सोपान पवार यांची नार्को टेस्ट करून मास्टरमाईंडला अटक करावी. 

पवार वर देशद्रोह सहित सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्येला जबाबदार धरून 302 अंतर्गत कार्यवाही करा. 

2) आंदोलक निरपराध भीमसैनिक महिलांवर हल्ला करणारे, सोमनाथ सूर्यवंशीचे हत्याकांड घडवणाऱ्या पोलिसांना तात्काळ मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली अटक करून कायमस्वरूपी बडतर्फ करावे. 

3) आंदोलनकर्त्यांवरील खोटे गुन्हे मागे घ्या. 

4) बी.आर. आंबेडकर या नावाच्या गाड्या फोडणाऱ्या सीसीटीव्ही मध्ये दिसणाऱ्या पोलिसांवर तात्काळ कारवाही करा. 

5) परभणी गठीत केलेली न्यायालयीन चौकशी मान्य नसून तात्काळ न्यायाधीश बदलवला पाहिजे.

6) पोलिसांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या कार्यकर्त्यांचे रिपोर्ट लपवणाऱ्या आरोग्य अधिकारी व जेलरला तात्काळ निलंबित करावे. 

7) कलम 176 (A ) सीआरपीसी अंतर्गत चौकशी करावी. 

8) परभणी पोलीस स्टेशन मधील सीसीटीव्ही जप्त करून ते तपासावेत. 

9) शहीद सोमनाथ सूर्यवंशीच्या पीडित कुटुंबाला रू. 2 कोटी तसेच शहीद विजय बाबा वाकोडे   यांच्या पीडित कुटुंबाला रु. 1 कोटींची मदत करून दोन्ही परिवारातील एका एका सदस्याला शासकीय नोकरी द्यावी. 

10) वच्‍छलाबाई मानवते या रमाईच्या लेकीला अमानुष मारहाण करणाऱ्या पोलिसांवर 354/307 अंतर्गत कार्यवाही करावी. या लेकीला रु. 10 लाखांची मदत करून तिचे पुनर्वसन करावे. 

11) पोलिसांनी कोमिंग मध्ये मारहाण करून जखमी केलेल्या सैनिकांना आर्थिक मदत करावी. 

12) शहीद सोमनाथ सूर्यवंशीचे परभणीत स्मारक करावे.

13) संतोष देशमुख यांच्या सर्व आरोपींना अटक करून आरोपींना फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून फाशी झालीच पाहिजे. आरोपींची नार्को टेस्ट झालीच पाहिजे. 

कुटुंबाला आर्थिक मदत व शासकीय नोकरी द्यावी. 

14) लातूर माऊली सोट च्या मारेकऱ्यांना फाशी झालीच पाहिजे. पीडित कुटुंबाला आर्थिक मदत व भावाला शासकीय नोकरी द्यावी. 

तात्काळ मागण्या मान्य करा अन्यथा आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा गर्भित इशारा निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला. 

निवेदन देतेवेळी तालुका अध्यक्ष पॅंथर भाऊजी कोलते महादेव अहिरे, क्रिश आहिरे, उदेभान 

 सुरडकर , राहुल इंगळे, एडवोकेट पुकराज सुरळकर, कृष्णा गरुडे , सलीम शेख, इम्रान शहा इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.




-पॅंथर प्रल्हाद भाई कोलते 

बुलढाणा जिल्हा महासचिव 

ऑल इंडिया पॅंथर सेना 

#BahujanLivesMatter

Post a Comment

0 Comments