*माटरगाव खून प्रकरणातील आरोपी सोपान मिरगेला शेगांव न्यायालयाने सुनावली ४ दिवसाची पोलीस कोठडी*
जलंब : माटरगाव येथील आठवडी बाजारामध्ये जिगाव प्रकल्पात गेलेल्या शेतीच्या पैशाच्या वादावरून सख्या चुलत भावाने चुलत भावाच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करून निर्घुण खून केला होता. याप्रकरणी तील मुख्य आरोपी सोपान मिरगेला १८ जानेवारी रोजी शनिवारी जलंब पोलिसांनी शेगाव येथील न्यायालयात हजर केले असता शेगांव न्यायालयाने त्याला ४ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. मृतकाचे वडील श्रीराम ओंकार मिरगे वय ७० वर्ष रा
भास्तन यांनी दिलेल्या
फिर्यादीवरून जलंब पोलिसांनी आरोपी सोपान सदाशिव मिरगे व त्याची पत्नी सौ. मीना सोपान मिरगे यांच्या विरुद्ध अप नं. १७ / २०२५ कलम १०३ (१), ११८, ३ (५) B NS अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, डीवायएसपी विनोद ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जलंब पो.स्टे. चे. ठाणेदार अमोल सांगळे, पोका रवींद्र गायकवाड करीत आहे.

Post a Comment
0 Comments