Type Here to Get Search Results !

डिजिटल मिडिया परिषदेच्या शेगांव तालुकाध्यक्ष पदी विवेक शेगांवकर तर उपाध्यक्ष पदी इस्माईल शेख

 डिजिटल मिडिया परिषदेच्या शेगांव तालुकाध्यक्ष पदी विवेक शेगांवकर तर उपाध्यक्ष पदी इस्माईल शेख 




नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती देऊन सन्मानित करण्यात आले 


शेगांव : मराठी पत्रिका परिषदेचे मुख्य विश्वस्थ माननीय श्री. एस. एम. देशमुख सर यांच्या आदेशानुसार मराठी पत्रकार परिषद संलग्नित असलेल्या डिजिटल मीडिया परिषदेची शेगांव तालुका कार्यकारिणी गठित करण्यात आली. 

डिजिटल मीडिया परिषदेच्या माध्यमातून शेगाव तालुक्यात संघटनात्मक सक्रिय काम केल्याबद्दल राज्य उपाध्यक्ष अनिलजी उंबरकर, बुलढाणा जिल्हाध्यक्ष श्रीधर ढगे, जिल्हा उपाध्यक्ष नारायण दाभाडे यांच्या हस्ते शेगाव येथील पत्रकार विवेक शेगावकर यांची डिजिटल मिडिया परिषद शेगाव तालुका अध्यक्षपदी तर इस्माईल शेख यांची शेगाव तालुका उपाध्यक्षपदी, विजय खंडेराव यांची तालुका संघटकपदी तर संतोष देठे पाटील यांची तालुका संघटक पदी निवड करण्यात आली.

Post a Comment

0 Comments