जळगावच्या पालकमंत्री पदाची माळ पुन्हा गुलाबराव पाटील यांच्या गळ्यात..................................... जळगाव मुक्ताईनगर............. राज्यात जिल्ह्यामधील अखेर पालकमंत्री पदाचा तिढा अखेर सुटला असुन महायुतीकडुन पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली असून जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील असणार आहेत.तर नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन असणार आहेत.विधानसभा निवडणुकीचा निकाल आणि यानंतर मंत्रीपदाचा शपथविधी होऊन देखील.अद्याप पालकमंत्री पदाची यादी जाहीर झालेली नव्हती.यातच जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती.गेल्या अनेक वर्षे झाले पालकमंत्री पदाची धुरा गुलाबराव पाटील यांच्या कडे असले तरी येथे भाजपकडून दावा करण्यात आला होता.यामुळे पालकमंत्री पद नेमके कोणाला मिळणार याची मोठी उत्सुकता निर्माण झाली होती.या पार्श्व भूमीवर आज राज्य सरकारने यादी जाहीर केली आहे यामध्ये जळगांवचे पालकमंत्री म्हणून शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांची निवड करण्यात आलेली आहे.
Post a Comment
0 Comments