टक्कल पडणे वगैरे साथ नाही -- मा. श्री गुलाब खरात सी ई ओ बुलढाणा याची शेगांव तालुक्यातील माटरगाव ला भेट
January 10, 2025
0
टक्कल पडणे वगैरे साथ नाही -- मा. श्री गुलाब खरात
Ceo बुलढाणा -- बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात, कालवड, कठोरा, माटरगाव बु इत्यादी गावात मुलांना, मुलींना काही पुरुष व महिलांना टक्कल पडले आहे. त्यांचे डोक्याचे पूर्ण केस गळती झाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आज दिनांक 10/01/2025 ला माननीय गुलाब खरात साहेब सी ई ओ बुलढाणा यांनी कालवड, काथोरा, माटरगाव बु येथील शांताराम दामोदर यांच्या कुटुंबान्ना भेट देऊन मार्गदर्शन केले.माटरगाव बु येथील शांताराम दामोदर यांचे कुटुंबात तीन मुलींचे पूर्ण टक्कल पडले असून गावात इतर काही लोकांचे पण टक्कल पडले आहे.टक्कल पडणे हा कोणता आजार नसून नागरिकांनी घाबरून जाऊ नये. आरोग्य विभाग आपल्या रोज संपर्कात असेल. रक्ताचे व पाण्याचे नमुने नासिक व बुलढाणा येथे लॅब ला पाठविले आहेत. हा साथ वगैरे असा काही प्रकार नाही. घाबरून जाण्याचे काही कारण नाही असे मत साहेबांनी व्यक्त केले. सोबत आरोग्य टीम डॉ भगत म्याडम सह,गौरी तायडे औषधं निर्माण अधिकारी,आशा सौ संगीता वानखडे ,ग्रामविकास अधिकारी श्री आर आर सावरकर, ग्रा प सदस्य पती विठ्ठल भाऊ अहिर, ग्रामपंचायत कर्मचारी विजू भाऊ हिरळकर, कॉम्पुटर ऑपरेटर प्रदीप राऊत, अनंत वाकोळे रो. सेवक इत्यादी हजर होते.


Post a Comment
0 Comments