*कृषी उत्पन्न बाजार समितिचा मनमानी कार्यभार शेतकऱ्याची मापात लूट थांबवायचे असेल तर प्रामाणिकपणे सर्व अळत्यांना इलेक्ट्रॉनिक काटे द्या शेतकऱ्यांची मागणी शेतकरी गजानन राऊत*
January 10, 2025
0
*कृषी उत्पन्न बाजार समितिचा मनमानी कार्यभार शेतकऱ्याची मापात लूट थांबवायचे असेल तर प्रामाणिकपणे सर्व अळत्यांना इलेक्ट्रॉनिक काटे द्या शेतकऱ्यांची मागणी शेतकरी गजानन राऊत*ही एक प्रकारे अन्नदात्या शेतकऱ्यांची फार मोठी लूट आहे याला लुटीपेक्षाही हा दिवसा ढवळे शेतकऱ्यांच्या मालावर दरोडा टाकलेला आहे पहिले शेतकरी नापिकीमुळे त्रस्त आहे त्यामध्ये सोयाबीन आणि तुरीला भाव नाही पंधरा ते एक महिन्याच्या अगोदर तू रे दहा ते अकरा हजार रुपये विकत होती सोयाबीन हे साडेतीन ते चार हजारावर आला शेतमालाला भाव नाही आणि त्याच्यात हे असे शेतकऱ्याची लूट करतात शेतात पीक नाही हातात पैसा नाही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सन्माननीय संचालक मंडळांनी वास्तविक पाहता खामगाव ही विदर्भातील मोठी बाजारपेठ आहे आज अकोल्यासारखे ठिकाणी इलेक्ट्रॉनिक काटे आहेत पण खामगाव बाजार उत्पन्न समितीमध्ये आजपर्यंत ही इलेक्ट्रॉनिक काटे बसवण्यात आलेले नाहीत वास्तविक पाहता हे हे युग संगणकीय युग आहे जर कृषी उत्पन्न बाजार समितीला खरोखर शेतकऱ्यांचा फायदा करायचा असेल तर प्रत्येकाला इलेक्ट्रॉनिक काटे द्यायला पाहिजेत कारण या साध्या काठावर प्रत्येक शेतकऱ्याचा माल हा शिल्लक जातो इलेक्ट्रॉनिक काट्यावर शेतकऱ्याला त्याचं नीट वजन समजते पण ही शहाणपण आपल्या विदर्भातील सर्वात मोठे असलेल्या खामगाव बाजार समितीला केव्हा येणार हे देवालाच माहित वास्तविक पाहता जे शेतकऱ्यांचे लोकप्रतिनिधी आहे जे शेतकऱ्यांच्या मतावर निवडून येतात ते कोणत्याही पक्षाचे असो सर्व पक्षातील थोर नेत्यांनी हा शेतकऱ्याबद्दलचा आवाज उठवायला पाहिजे आणि लवकरात लवकर आपल्या खामगाव बाजार समितीमध्ये इलेक्ट्रॉनिक काटे बसून शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवायला पाहिजे आपलाच एक शेतकरी

Post a Comment
0 Comments