(निखिल मिरगे शेगांव) बुलढाणा जिल्यातिल आठ तालुक्यांत उदभवू शकतो गंभीर आजार
पाण्यामध्ये नायट्रेटचे प्रमाण वाढल्यामुळे जिल्ह्यात 'ब्ल्यू बेबी सिंड्रोम' आजाराची साथ
दिनेश मुडे | बुलडाणा
पाणी हे जीवन समजले जाते. परंतु जिल्ह्यातील कमी-अधिक प्रमाणात सर्वच तालुक्यात दूषित पाण्यामुळे अख्खा जिल्हा ब्लू बेबी सिंड्रोम च्या छायेत असल्याची खळबळजनक माहिती ८ जानेवारी रोजी समोर आली. या आजाराची जिल्हावासीयांना पुसटशी कल्पना ही नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
केंद्रीय भूजल मंडळाच्या वार्षिक भूजल गुणवत्ता अहवालात जिल्ह्यातील भूजलात विषारी पदार्थ असल्याची घोषणा करण्यात आली होती. याकडे आरोग्य विभाग व लोकप्रतिनिधींचे सातत्याने दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे घाटाखालील तालुक्यात मोठ्या प्रमाणात किडनीग्रस्तांची संख्या अधीक आहे. परंतु आता यासह इतर आजार ही हळूहळू डोके वर काढत असल्याचे चित्र आहे. चार दिवसांपूर्वीच घाटाखालील शेगाव तालुक्यातील अनेक गावात तीन दिवसांत टक्कल अशी उर्वरित पान ४
केंद्रीय भूजल मंडळाचा वार्षिक गुणवत्ता अहवाल
काय आहे ब्लू बेबी सिंड्रोम
या आजाराला इन्फंट मेथेमोग्लोबिनेमिया देखील म्हणतात. यामुळे बाळाची त्वचा निळसर होण्यास सुरु होते. यामुळे बाळाच्या रक्तातील हिमोग्लोबिन वेगाने कमी होत जाते. हिमोग्लोबिन हे शरीरात ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी विकासासाठी आवश्यक असते. आणि विविध पेशीच्या मेंदूला रक्त अथवा ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यास त्याचे परिणाम हे हृदयविकार अथवा अर्धांगवायू सारख्या आजारात परिवर्तीत होवू शकतो.
भूजल दूषित होण्याची विविध कारणे
जिल्ह्यात मोठया प्रमाणात रासायनीक खताचा वापर केला जातो. सांडपाणी व सेफ्टीक प्रक्रिया, जैविक कचऱ्याची विल्हेवाट, औद्योगिक वसाहतीतून निघणारे पाण्याची योग्य विल्हेवाट न लागणे, पाण्याचे पुनर्भरण न होणे यामुळे जमिनीचा पोत खालावून हे विषारी घटक थेट पाण्यात मिसळत आहेत व याच पाण्याचा वापर हैंडपंप व विहिरीतून उपसा करुन केला जातो.
जिल्ह्यामधील १३५ नमुने दूषित आढळले
जिल्ह्यातील शेगाव, नांदूरा, जळगाव जामोद, खामगाव, देऊळगावराजा, सिंदखेडराजा, मलकापूर व मोताळा या आ तालुक्यांतील अनेक गावांतील पाण्याचे नमुने सर्व्हे क्षण विभागाच्या वतीने घेण्यात आले होते. या तालुक्यातील १३५ पाण्याचे नमुने हे दूषित आढळून आले असून यात नायट्रेटव टीडीएसचे प्रमाण आढळले आहे.
वरिष्ठ स्तरावरून आदेश नाही
त्यात नायट्रेटच्या अति सेवनाने वृध्द व लहान बालकांना ब्लू बेबी सिंड्रोमचा धोका अधिक असतो. जिल्ह्यात भूजल सर्व्हेक्षण विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या तपासणीत जिल्ह्यातील अनेक तालुक्यात दूषित पाणी आढळले आहे.
वरिष्ठस्तरवरुन कोणतेही आदेश मिळाले नाही. -भागवत भुसारी, जिल्हा शल्य चिकित्सक बुलडाणा
ही सर्व माहिती मिळून त्यामध्ये क्लास वन अधिकारी साहेब, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजु भाऊ पाटील, शिवसेना तालुका प्रमुख रामाभाऊ था रकर , शिवसेना सोशल मीडिया तालुका प्रमुख निखिल पाटील, ग्रामसेवकसाहेब, तलाठी साहेब
Post a Comment
0 Comments