Type Here to Get Search Results !

विहिरीत आढळला बिबट्या मृत अवस्थेत

 विहिरीत आढळला बिबट्या मृत अवस्थेत


............................. मुक्ताईनगर (प्रतिनिधी) कुर्हा काकोडा (संदीप घाईट):-विहीरीत आढळला बिबट्या मृतअवस्थेत. मुक्ताईनगर तालुक्यातील भोटा शेती शिवारात बिबट्याचा मृत्यू झाला असुन .शिकारीचा पाठलाग करतांना बिबट्या विहिरीत पडल्याचा अंदाज वर्तविन्यात येत आहे.कुर्हा येथुन जवळच असलेल्या भोटा येथील शेती गट क्रमांक ८१ मधील रायबा तुळसीराम मोरे हे बुधवारच्या सकाळी शेतात गेले असता त्यांना दुर्गंधी येत होती हे दुर्गंधी कुठुन येत आहे याचा शोध घेत ते विहीरीजवळ पोहचले त्यांनी विहीरीत डोकाऊन बघितले असता बिबट्या मृतावस्थेत पाण्यात तरंगताना आढळून आला.त्यांनी लगेच पोलीस पाटील यांना हे माहिती दिली असता राम पाटील यांनी वनविभागाला कळवतांच वनक्षेत्र पाल परिमल साळुंखे,स्वप्निल गोसावी,अक्षय मोरे,सुधाकर कोळी, उमेश तायडे,कविता पावरा,वनमजूर योगेश बोरशे महेंद्र पुरस्कार,गौतम मोरे,रसूल तडवी, यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली व बिबट्याचा मृतदेह विहीरीतुन बाहेर काढण्यात आला.त्यासठिकाणी शवविच्छेदन करुण बिबट्यावर अत्यसंस्कार करण्यात आले.

Post a Comment

0 Comments