जळगावमध्ये मोठा रेल्वे अपघात रेल्वेने प्रवाशांना चिरडलेउ................................... जळगाव
मुक्ताईनगर प्रतिनिधी:-संदीप घाईट:- जळगाव जिल्ह्यातील पाचोरा नजीक परधाडे स्टेशन जवळ रेल्वेचा मोठा अपघात घडला.यामध्ये ११ प्रवाशांचा मृत्यू झाला असुन ४ जण गंभीर जखमी आहेत.तर काही प्रवाशांचा शासकीय व खाजगी रुग्णालयात उपचार सुरू.सविस्तर जळगाव पासुन ४० किमी अंतरावर परधाडे हे छोटेशे स्टेशन आहे.मुबंई च्या दिशेने जाणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसमध्ये अचानक कोणीतरी चैन ओढली अचानक गाडीचे ब्रेक लागल्याने चिंग्या उडाल्या यामुळे धुर निघाल्याने प्रवाशांना वाटले गाडी मध्ये आग लागली यामुळे प्रवाशांनी उड्या मारल्या परंतु त्या ठिकाणी वळण असल्याने मागुन येणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेस प्रवाशांना न दिसल्याने कर्नाटक एक्स्प्रेससने प्रवाशांना धडक धडक दिली. यामध्ये ११ प्रवाशांचा मृत्यू झाला तर ४ प्रवांशी गंभीर जखमी झाले असुन काही प्रवाशी किरकोळ जखमी असुन जखमीचा शासकिय व खाजगी रुग्णालयात उपचार सुरू.जखमीचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करणार असून मृत्यू पडलेल्यांना राज्य सरकार ५ लाखाची मदत देणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले तर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिदे यांनी अपघांताची माहिती घेत घटना अत्यंत दुर्देवी असुन घटनेची सखोल चौकशी करण्यात येईल व राज्य सरकार कडून सर्वच मदत देण्यात येईल .तर अनिल देशमुख यांनी सुध्दा घटनेची माहिती घेत घटना अत्यंत दुर्देवी.तर याठिकाणी मंत्री गिरीशजी महाजन ,पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार स्मीताताई वाघ घटनास्थळी लक्ष्य ठेऊन आहेत .

Post a Comment
0 Comments