(सिध्देश्वर निर्मळ खामगांव)
» शेगाव महसूल प्रशासनाची धडक कारवाई
जलंब : शेगाव येथील तहसीलदार यांच्या पथकाने कठोरा शिवारात असलेल्या पूर्णा नदीपात्रातून विनापरवाना अवैध
रित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या ५ टिप्पर व एक ट्रॅक्टरला पकडले असून ८ लाख २० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला असून सदर वाहने जलंब पोस्टेला लावण्यात आली आहे. ही घटना ८ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता च्या सुमारास घडली. तर तहसीलदार दिपक बाजड यांच्या पथकाने ही धाडसी कारवाई केल्यामुळे परिसरातील रेती
माफीयांचे धाबे दणाणले आहे.
याबाबत वृत्त असे की, शेगाव तालुक्यातील कठोरा शिवारातील पूर्णा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध रित्या रेतीचा उपसा करून वाहतूक करीत असल्याची गुप्त माहिती शेगाव येथील तहसीलदार यांच्या पथकाला मिळाली. त्यामुळे महसूल पथकाने एका खाजगी वाहनाने नदीपात्रात जाऊन नदीपात्रातून अवैध रित्या रेतीची वाहतुक करताना ५ टिप्पर व केनी सह ट्रॅक्टर रंगेहाथ पकडले. याबाबत जलंब पो.स्टे. चे ठाणेदार अमोल सांगळे यांना महसूल प्रशासनाकडून
अवैध रित्या वाळू चा उपसा करणाऱ्या वाहनावर यापुढे सुद्धा अशाच प्रकारे कारवाई सुरू ठेवण्यात येईल. तसेच पूर्णा नदीपात्रातून वाळु माफियाकडुन अवैध रित्या वाळुचा उपसा होत असल्यास या बाबत ची माहिती हि महसूल प्रशासनाला देण्यात यावी. दिपक बाजड तहसीलदार शेगाव
माहिती मिळतातच ठाणेदार व पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले व पकडलेले ५ टिप्पर, केनी सह ट्रॅक्टर हे जलंब पोस्टेला लावण्यात आले आहे.
सदर कारवाई शेगावतहसीलदार दिपक बाजड, नायब तहसीलदार विजय खेडकर, मंडळ अधिकारी संजय धमाळ, रवींद्र मुंढे, राजू राठोड, तलाठी अरुण डाबेराव, सुरेश राठोड, श्रीकांत हाके, अमोल गीते, चौधरी आदी महसूल पथकातील कर्मचाऱ्यांनी केली आहे.


Post a Comment
0 Comments