Type Here to Get Search Results !

विद्यार्थ्यांची पुर्ण शारिरीक तपासणी व मोफत रक्तगट तपासणी करण्यात यावी विदयार्थी सेना शहर प्रमुख विकी सारवान*



*विद्यार्थ्यांची पुर्ण शारिरीक तपासणी व मोफत रक्तगट तपासणी करण्यात यावी विदयार्थी सेना शहर प्रमुख विकी सारवान*

(सिध्देश्वर निर्मळ खामगांव)
अशा आशयाचे निवेदन आज शिवसेना विद्यार्थी सेनेच्या वतीने सामान्य रुग्णालय चे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर निलेश सर ठापरे यांना देण्यात आले.
निवेदानात नमूद आहे की, खामगांव शहरातील शाळा व कॉलेजच्या मुलांना रक्तगट व शारिरीक तपासणीसाठी अतिरिक्त पैशांचा भोगदान करावे लागते आणि त्यांना रूग्णालयात पूर्ण दिवस गमवावे लागतात. त्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गैरसोई होत आहे. शाळा व कॉलेजच्या काही विद्यार्थ्यांची घराची परिस्थिती हलाकीची असल्यामुळे व आपल्या शरीराकडे ना-ईलाजास्तव दुर्लक्ष करावे लागते.
आपल्या रूग्णालयात किंवा शाळा व कॉलेजमध्ये कॅम्प लाऊन विद्यार्थ्यांची प्रत्येक महिन्यात किंवा आपल्या सोयीनुसार विद्यार्थ्यांची मोफत तपासणी करावी जेणे करून त्यांची शिक्षणाची गैरसोई होणार नाही व विद्यार्थी आपल्या जिवनात शारिरीक दृष्ट्या सदृढ राहतील. निवेदनावर धीरज कंटाळे वैदयकिय जि.अध्यक्ष, सिद्धेश्वर निर्मळ शिववाहतूक, ता.अध्यक्ष आनंद सारसर वैदयकिय ता.अध्यक्ष, पकज अंबारे वैदकिय शहर प्रमुख,अनिरुद्ध नेमाने किसान सेना ता.प्रमुख ,बंटी सुकाळे शिवसेना उपशहर प्रमुख,गोपाल भाऊ वरणगाव,युवा सेना संघटक, सुनिल नवले युवा सेना उपशहर प्रमुख, जितु गोयल शिवसेना उपशहर प्रमुख,किशोर पवार आदिंची शिवसेना युवा सेना पदाधिकारी यांची उपस्थिती होती

Post a Comment

0 Comments