*साईसेवा आणि मुठेवाडगाव रक्तदान परिवारास प्रतिनिधिक श्री. अभयकुमार तेलतुंबडे हे दरभंगा बिहार येथे राष्ट्रीय सेवा रत्न सन्मानाने सन्मानित*
विशेष श्रीरामपूर :-रक्तदात्यांचा महाकुंभ मेळा,समर्पण मिथिला आयोजित ,दरभंगा,बिहार येथे दोन दिवसीय राष्ट्रीय रक्तदाता संमेलनाचे पार पडले. या संमेलनात संपूर्ण भारातभरातून आणि नेपालसह २१५ संस्थाचा सन्मान करण्यात आला.
रक्तवीर व शतकवीर रक्तदातांचा इतिहासाचा परिचय करून देऊन दिनांक ११ जानेवारी २०२२ रोजी शतकवीर रक्तदात्यांच्या हस्ते दीप प्रज्वलीत करून. कार्यक्रमाचे थाटात उदघाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला उपस्थित उल्लेखला सर्वांचे सर्वेसर्वा सदस्य समर्था सदस्य कार्यकर्ता मिथिलाचे राष्ट्रीय महामंत्री दिवंगत कुमार महाराष्ट्रीय उमेश प्रसाद, कोषाध्यक्ष रंजीत श्रीवास्तव, राकेश रंजन यांच्या मार्गदर्शनात सहभागी झाले तसेच दिनांक १२ जानेवारी २०२५ ला सांस्कृतिक नृत्याचा कार्यक्रम प्रसारित केला. गो. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन समर्पण मिथिलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मृदुकुमार शुक्ला (वरिष्ठ भाजपा नेता दरभंगा बिहार) यांच्या मार्गदर्शनात रक्तदान शिबिराचे शिबिरात शिबिरात शेकडो रक्तदान करून मानवतेचे दर्शन घडवले. यात श्री. अभयकुमार तेलतुंबडे (मुठेवाडगाव) शिर्डी साईसेवा &मुठेवाडगाव रक्तदान परिवार यांनी त्यांचे 121 वे रक्तदान सर्व रक्तदात्याच्या समवेत पूर्ण केले मिथिला दरभंगा रक्त सितामातेच्या जन्मभूमीत हे रक्तदान पार पडले,रक्तदान शिबिरात सर्वात जास्त महाराष्ट्राच्या रक्तदानातून रक्तदान करून पुन्हा एकदा रक्तदान दिलेले राज्य महाराष्ट्र १ नंबरला आहे. नागरिक या रक्तसेवा , रुग्णसेवा,अवयव दान, थँलेसेमिया, सिकलसेल तसेच, कोरोना काळातील सेवा, अनेक रक्तदान शिबीरे घेणे अशा अनेक प्रकारची सेवेची मदत गरजूसाठीहोते या कार्याची प्रशंसा करत आहेत
डॉ. मृदुल कुमार शुक्ला , डॉ. सौ. गुंजन त्रिवेदी वेद दलान रिझार्टचे संस्थापक अध्यक्ष यांच्या हस्ते श्री. अभयकुमार तेलतुंबडे (शिर्डी ) मुठेवाडगाव यांना *राष्ट्रीय सेवा रत्न*या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यांनी हारफुल, मालार्पण, शिल्ड,प्रमाणपत्र, लाल दुपट्टा, गिफ्ट बोक्स सन्मानाने सन्मानित करून पुढील वाटचालीस तयार केले.या पुरस्काराने मुठेवाडगाव सारख्या छोट्याश्या गावाला देशपातळीवर सन्मान मिळवून दिल्या बद्दल त्यांचे सर्व थरातून कौतुक करण्यात येत आहे. विविध संस्थानी त्यांचे सत्कार आयोजित केले आहेत.




Post a Comment
0 Comments