दोन जिल्ह्याच्या सिमेवर असलेले वारी हनुमान संस्थानवर दरोडा, पुजाऱ्याला बांधून लाखोंचा ऐवज लंपास(
राजु घाटे): बुलढाणा अकोला जिल्ह्याच्या आणि मध्यप्रदेशच्या सीमेला लागून असलेल्या सुप्रसिद्ध वारी हनुमान संस्थान येथे आज धाडसी दरोडा पडला. अज्ञात दरोडेखोरांनी मंदिराच्या पुजारीला बांधून ठेवत मंदिरातील दागिने आणि दानपेटीतील रोख रक्कम असा लाखोंचा ऐवज लंपास केला या परिणामी जिल्ह्यासह राज्यभरातील लाखो भाविकांत खळबळ उडाली असून जनमानस प्रक्षुब्ध झाल्याचे चित्र आहे. आज बुधवारी, पंधरा जानेवारीला उत्तररात्री हा थरारक आणि तितकाच धक्कादायक घटनाक्रम घडला आहे . घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी
श्वान पथक, हस्त मुद्रा तज्ञ दाखल
झाले आहे. ठिकठिकाणी नाकाबंदी करून दरोडेखोरांचा युद्ध पातळीवर शोध घेण्यात येत आहे.
सातपुड्याच्या पायथ्याशी व मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेले वारी हनुमान हे मंदिर समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापित केल्याची वंदता आहे. वान प्रकल्प परिसरात निसर्ग रम्य परिसरात हे पुरातन जागृत असे हनुमानाचे मंदिर आहे. बुलढाणा, अकोला आणि विदर्भासह राज्यातील लाखो भाविक, पर्यटक इथे वर्षभर येतात. परराज्यातून देखील या ठिकाणी भाविक येत असतात. यामुळे या संस्थानात आज बुधवारी उत्तररात्री पडलेल्या दरोड्याने विश्वस्त आणि लाखो भाविकांना मोठा धक्का बसला आहे .

Post a Comment
0 Comments