शेगाव, व नांदुरा तालुक्यांत केसगळती प्रकरणात रुग्णसंख्या पोहोचली १५६ वर
(बुलढाणा प्रतीनीधी) - केसगळती प्रकरणात सर्वेक्षणादरम्यान शेगाव, नांदुरा तालुक्यांतील गावामध्ये सोमवारी आणखी रुग्णांची भर पडली असून, आता रुग्णसंख्या १५६ वर पोहचली आहे. त्यामध्ये नांदुरा तालुक्यातील वाडी येथील सात रुग्णांचा समावेश आहे. प्रभावित गावांमध्ये होमिओपॅथी रिसर्च सेंटर चमू व आरोग्य उपसंचालकांनी सोमवारी भेट दिली. दिल्लीच्या रिसर्च संस्थेने या प्रकरणाची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे माहिती घेतली. त्यामध्ये आयुर्वेद, युनानी व होमिओपॅथीच्या डॉक्टरांचा समावेश आहे. शेगाव तालुक्यातील ११ गावे, नांदुरा तालुक्यातील वाडी येथे केसगळतीच्या समस्येने नागरिक हैराण झाले आहेत.
दिवसेंदिवस बाधित रुग्णांमध्ये वाढ होत आहे. हा प्रकार नेमका कशामुळे होत आहे, याबाबत ठोस पुरावे उपलब्ध नसल्याने विविध आरोग्य संस्था गावांना भेट देत आहेत. सोमवारी प्रादेशिक होमिओपथी संशोधन संस्थेतर्गत केंद्रीय होमिओपॅथी संशोधन परिषद, आयुष मंत्रालय भारत सरकार, नवी दिल्ली येथील डॉ. ट्रिकल कौर भोगल डॉ प्रियंका सूर्यवंशी डॉ. गावात पथकातील सदस्यांनी रुग्णांकडून आरोग्याविषयी माहिती घेतली. 'आयसीएमआर'च्या संशोधनातून पुढे येणार कारण शेगाव, नांदुरा तालुक्यांत उद्भवलेल्या या प्रकाराची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. त्यासाठी आज मंगळवारी आयसीएमआर (इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे पथक बाधित गावांमध्ये भेट देणार आहे. त्यासाठी आरोग्य यंत्रणा तयार आहे, अशी माहिती जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. प्रशांत तांगडे यांनी दिली.
Post a Comment
0 Comments