मुक्ताईनगर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती व मराठा दिनदर्शिका प्रकाशनाचा कार्यक्रम संपन्न..................................... मुक्ताईनगर प्रतिनिधि (संदीप घाईट
)मकर संक्रातीच्या निमीत्ताने मुक्ताईनगर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती व मराठा दिनदर्शिकेच्या प्रकाशनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे आयोजन सकल मराठा समाज मुक्ताईनगर व छत्रपती शिवाजी महाराज उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले होते.कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता मॉसाहेब जिजाऊ यांच्या प्रतिमेच्या पुजनाने झाली उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हा पुजन सोहळा पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा समाजाचे अध्यक्ष आनंदराव देशमुख होते तर विशेष प्रमुख अतिथी म्हणुन आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली.याप्रसंगी आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.दरवर्षीप्रमाणे या वर्षीही मकर संक्रांती निमीत्ताने हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजातील एकोपा आणि ऐक्याचे महत्व अधोरेखित करण्यात आले.या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली . यावेळी आमदार चंद्रकांत भाऊ पाटील,सह मुक्ताईनगर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक नागेश मोहीते साहेब,अध्यक्ष आनंदराव देशमुख, दिनेश कदम मराठा वस्तीगृह कक्षांचे राष्ट्रीय अध्यक्ष, बोदवड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष आनंदराव देशमुख, नवनीत पाटील कुर्हा काकोडा मराठा समाजाचे अध्यक्ष, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष यु डी पाटील सर,भाजपा तालुकाध्यक्ष प्रफुल्ल जवरे, शिवसेना उप जिल्हा प्रमुख तसेच भोई समाज अध्यक्ष छोटुभाऊ भोई, व्यापारी संघटना तालुकाध्यक्ष नितीन बंटी जैन,राम रहिम रोटीचे अध्यक्ष किशोर गावंडे,हकीम चौधरी जिल्हा उपाध्यक्ष मुस्लिम मित्र बिरादर जळगाव, रामभाऊ पाटील माजी सरपंच पुरणाड,चिखली सरपंच वैभव पाटील, इच्छापुर सरपंच गणेश थेटे,शेमळदा संतोष पाटील,दिलीप श्रीराम पाटील, उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिलीप माळु पाटील, जितेंद्र मैहरे,वैभव कोल्हे,सचिन पाटील, गजानन पाटील आदिनी परिश्रम घेतले.

Post a Comment
0 Comments